भाजपाची शहरातील भोंगळ कारभाराबाबत नगरपरिषदेकडे तक्रार

प्रतिनिधी – धरणगाव

दि.24-05-2021 रोजी भारतीय जनता पार्टीने मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याकडे तक्रार केली की,काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्थानिक न्यूज चॅनेलवर मुलाखतीतून धरणगाव शहरातील जुनी पाईप लाइन बदलवून नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरू होईल त्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ती योजना पूर्ण करण्याचा मी संकल्प घेतला आहे,असे असतांना देखील शहरात सर्वदूर रोड रस्ते,पेव्हर ब्लॉकचे काम सुरू आहे नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरु होत असेल तर सदरील कामे व विचाराधीन कामे त्वरीत थांबविण्यात यावीत कारण जलवाहिणी बदलविण्याचा कामांमुळे शहरातील सर्व रस्ते खोदण्यात येतील त्यामुळे नवीन होत असलेली रोड रस्ते,पेव्हर ब्लॉकचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शासनाची आर्थिक हानी होईल.सत्ताधारी नगराध्यक्ष,नगरसेवक हे स्वतःचे आर्थिक हित जोपासत असुन शासनाचे नुकसान करीत आहेत त्यासाठी सुरु असलेली व विचाराधीन असलेली कामे थांबविण्यात यावी.तसे झाल्यास होणाऱ्या शासनाच्या आर्थिक नुकसानीस संबंधीत प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.


म.गांधी उद्यानातील झाडे भाजप तोडू देणार नाही
दि.11-05-2021 रोजी लोकमत वृत्तपत्रात नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने 38/2021या जाहीर नोटिसवरून सूचित केले की चोपडा रोडवरील महात्मा गांधी उद्यान विकसित करणेकामी उद्यानातील 19 झाडे अडसर ठरत असल्याकामी तोडण्यात येणार आहेत.
उद्यानात झाडे लावून शोभा वाढविली जाते मग आपण झाडे तोडण्याचा जुलमी निर्णय कसा घेतला?सदरील वृक्षांची पाहणी केली असता ते मृत नसून काही जातीच्या झाडांची पाने ही पूर्णपणे झडतात व पाऊस आल्यावर त्यांना नविन पालवी फुटून बहर येतो त्यामुळे नगरपरिषदेच्या म्हनण्या प्रमाणे उद्यानातील झाडे मृत आहेत हे मान्य करता येणार नाहीत.सदरील झाडे जशाच तसे ठेऊन उद्यान विकसित करावें.
अन्यथा झाडे तोडल्यास भारतीय जनता पार्टी संबंधितावर कायदेशीर कारवाई करेल.
सदर तक्रार अर्ज देते वेळी भाजप नेते शिरीषआप्पा बयास,तालुका उपाध्यक्ष प्रकाशदादा सोनवणे,शेखरदादा पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक शरदअण्णा धनगर,कडूअप्पा बयास,सुनील चौधरी,राजू महाजन, जुलाल भोई,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, विकास चौहान, योगेश महाजन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!