केंद्र सरकार, आणखी दहा हातमाग अधिकल्प संसाधन केंद्रांची उभारणी करणार

नवी दिल्ली,

हातमाग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वस्त्रोद्योग मंत्रालयाने काही पावले उचलली आहेत.

देशात कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कन्नूर, इंदोर, नागपूर, मीरत, भागलपुर आणि पानिपत या 10 ठिकाणी असलेल्या विणकर सेवा केंद्रांमध्ये राष्ट्रीय फॅशन डिझाईन संस्थेमार्फत डिझाईन रिसोर्स सेंटर्स (ींण्) म्हणजे अभिकल्प संसाधन केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हातमाग क्षेत्राला अभिकल्प रचना केंद्रित उत्कृष्टता प्राप्त करता येण्याच्या उद्देशाने तसेच विणकर, निर्यातदार, उत्पादक यांना वापर करता येण्यासाठी नमुना वा उत्पादनाची नक्कल, विकास यांच्यासाठी रचना ठेवा निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

र्‍घ्इऊ ही वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या येतील संस्था असल्यामुळे तसेच हातमाग उद्योग हा त्याचा एक भाग असल्यामुळे त्याचप्रमाणे र्‍घ्इऊ ही फॅशन आणि अभिकल्प या क्षेत्रातील नवीन कल्पनांचा वेध घेणारी उत्कृष्ट संस्था असल्यामुळे हातमागाला मिळणार्‍या बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल.

र्‍घ्इऊच्या विणकर सेवा केंद्रांमध्ये आता संसाधन केंद्रे उभारण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडेल?. या केंद्रांमध्ये निर्यातदार उत्पादक, अभी कल्पक हातमाग कारागीर आणि इतर संबंधितांसाठी रचना डिझाईन यांचा नमुने संग-ह आणि संसाधने उपलब्ध असतील. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी, जयपूर आणि वाराणसी येथील विणकर सेवा केंद्रांमध्ये अशा तर्?हेची अभिकल्प संसाधन केंद्रे याआधी उभारली गेली आहेत. याशिवाय कांचीपुरम येथे आठव्या अभिकल्प संसाधन केंद्राचे उद्घाटन सात ऑगस्ट 2019 रोजी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला मुंबई, चेन्नई, वाराणसी येथे 1956 मध्ये हातमाग अभिकल्प केंद्र सुरू झाले होते. त्यानंतर ही अभिकल्प केंद्रात मग वस्त्रोद्योगाच्या सर्व पैलूंचा समावेश करण्यात आला. याच केंद्रांची नंतर विणकर सेवा केंद्रे म्हणून पुनर्रचना करण्यात आली.

काही काळाने प्रत्येक विणकर सेवा केंद्राकडे मोठ्या संख्येने हातमाग अभिकल्प व नमुने यांचा संग-ह झाला. मध्यंतरीच्या काळात प्रतिष्ठीत अभिकल्पकांना या विणकर केंद्रांच्या समूहात समाविष्ट करून अभिकल्पाशी संबंधित नवनवीन कल्पना प्रशिक्षण आणि हातमाग उत्पादनांची बाजारपेठ वाढवणे यासाठी त्यांचा उपयोग केला गेला. अनेक अभिकल्कांशी सामंजस्य करार केले गेले. पण पुढे या प्रयत्नांना मर्यादित यश मिळाले आणि कालांतराने या बाबी विस्मृतीत गेल्या. यामुळे विणकाम आणि हातमाग क्षेत्रातील संबंधित तसेच लाभार्थी यांना अभिकल्पांची देवाण-घेवाण करता यावी किंवा फॅशन क्षेत्राशी या क्षेत्राला अप्रत्यक्षपणे ओळख व्हावी या उद्देशाने एक अभिकल्प संग-ह करण्याची कल्पना पुढे आली. विणकर सेवा केंद्रांमध्ये अभिकल्प संसाधन केंद्रे टप्प्याटप्प्याने उभारण्याचे काम र्‍घ्इऊ कडे सोपवले आहे.

1986 मध्ये स्थापन झालेली ही संस्था देशातील फॅशन संबंधित शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे आणि वस्त्रोद्योग तसेच तयार कपड्यांच्या उद्योगाला व्यावसायिक तसेच मनुष्यबळ पुरवणारी महत्त्वाची संस्था आहे.

काही वर्षात एनआयटी ही देशातील विविध ठिकाणी सतरा ठिकाणी परिसर उभी असलेली ही संस्था अभिकल्प विकास आणि हातमाग तसेच व्यवसाय या क्षेत्रांमध्ये आवश्यक असणार्‍या अभिकल्प विकासाला ज्ञान आणि सेवा पुरवणारी अग्रगण्य संस्था आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!