भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या ‘अमृत महोत्सव‘ कार्यक्रमांतर्गत 75 ‘हुनर हाट‘ आयोजित केले जातील: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
नवी दिल्ली,
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या ‘अमृत महोत्सव‘ कार्यक्रमांतर्गत देशभरात आयोजित 75 ‘हुनर हाट‘ च्या माध्यमातून 7 लाख 50 हजार कारागीर, शिल्पकारांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे अशी माहिती अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज नवी दिल्ली इथे दिली.
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्या ‘वक्फ तारकियती योजना‘ आणि ‘प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमा‘ (झ्श्व्%ख्) अंतर्गत देशभरातील मोकळ्या वक्फ जमिनींवर 75 ‘अमृत महोत्सव उद्याने‘ देखील बांधली जातील असे नक्वी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशाच्या सर्व भागांमध्ये ‘व्होकल फॉर लोकल‘ या संकल्पनेसह 75 ‘हुनर हाट‘ आयोजित केले जातील, जेथे देशातील प्रत्येक भागातील कारागीर, शिल्पकार त्यांच्या हस्तनिर्मित स्वदेशी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करतील. ‘हुनर हाट‘ मध्ये पारंपरिक पाककला तज्ञांचा ‘बावर्चीखाना‘ विभाग देखील असेल जेथे लोक देशाच्या विविध भागांतील पारंपारिक पाककृती आणि पदार्थांचा आस्वाद घेतील. ‘हुनर हाट‘ मध्ये दररोज संध्याकाळी देशातील नामांकित कलाकारांद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील.
मंत्री म्हणाले की, ‘अमृत महोत्सव‘ अंतर्गत ‘मेरा वतन, मेरा चमन‘ मुशायरा आणि कवी संमेलने देखील 2023 पर्यंत देशभरात आयोजित केली जातील, जेथे प्रसिद्ध आणि उदयोन्मुख कवी ‘एक भारत-श्रेष्ठ भारत‘ चा प्रभावी आणि देशभक्तीपर संदेश देतील.
देशभरातील 75 ‘अमृत महोत्सव उद्याने‘ बांधण्यासाठी देशातील विविध वक्फ बोर्डाकडून जमीन दिली जात आहे. ही ‘अमृत महोत्सव उद्याने‘ स्वातंत्र्य संग-ामात त्या विशिष्ट प्रदेशाच्या भूमिकेचा इतिहास देखील कलात्मक पद्धतीने दर्शवतील. या उद्यानांमध्ये योग, व्यायाम, चालणे, मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, हरित क्षेत्र आणि सामान्य सेवा केंद्र या सुविधाही असतील असे नक्वी म्हणाले.