परतुरात कायदेविषयक शिबीर

परतुर,

परतुर येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात कायदेविषयक शिबीर व जागतीक युवा दिन 12 ऑगस्ट रोजी कोविडचे नियम पाळून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती परतूरच्या अध्यक्षा पुजा ना. कोकाटे तर प्रमुख पाहूणे म्हणून विधिज्ञ श्री.जे.पी.बागल हे होते. व्याख्याते म्हणून एन.पी. वेडेकर यांनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ?ॅड. ए.जे. म्हस्के, सहा. सरकारी अभियोक्ता , भगवान जाधव, मुजाहेद पटेल, अ?ॅड. एस.जी. देशपांडे, जेष्ठ विधिज्ञ ए.आर. देशपांडे यांची उपस्थिती होती. दिवाणी न्यायाधिश क. स्तर न्या. पी.एन. कोकाटे, यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. भारत खंदारे, प्राचार्य संभाजी तिडके, उपप्राचार्य डॉ. रवि प्रधान, सुधाकर जाधव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन अ?ॅड. ए.ए. जवळेकर यांनी केले. आभार विधीज्ञ एन.एम. म्हस्के यांनी मानले. यावेळी लिपीक भावसार, विद्यार्थी, शिक्षक, वकील, कर्मचारी व इतरांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!