बहुप्रतीक्षित ओला ई स्कुटर आली

नवी दिल्ली,

ओला ने त्यांची बहुप्रतीक्षित ई स्कुटर 15 ऑॅगस्ट रोजी अखेर लाँच केली आहे. दोन व्हेरीयंट मध्ये आलेली ही स्कुटर ओला एस 1 आणि एस वन प्रो या नावांनी बाजारात दाखल झाली आहे. ऑॅनलाईन कॅब सेवा कंपनी ओलाची ही पहिली इलेक्ट्रिक स्कुटर तमिळनाडू मधील प्रकल्पात तयार झाली असून दरवर्षी 1 कोटी स्कुटर उत्पादनाची या प्रकल्पाची क्षमता आहे.

ओला ई स्कुटरचे बुकिंग अगोदरच सुरु झाले होते. ज्यांनी ही स्कुटर बुक केली आहे त्यांना घरपोच डिलीव्हरी दिली जाणार आहे. एस 1 ची किंमत 99,999 रुपये असून एस 1 प्रो साठी 1 लाख 27 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या दोन्ही किंमती एक्स शो रूम आहेत.

एस 1 मध्ये भारतीय ग-ाहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार फिचर्स दिली गेली आहेत. कनेक्टीव्हिटी पर्यायाबरोबर 7 इंची टच स्क्रीन डिस्प्ले, रिवर्स मोड, क्रुझ कंट्रोल, फास्ट चार्जिंग, बिल्ट इन स्पीकर, व्होईस कमांड अशी फिचर्स आणि तीन रायडिंग मोड आहेत. ही स्कुटर सहा तासात पूर्ण चार्ज होते आणि एका चार्ज मध्ये 150 किमी जाते. ओला सुपर चार्जरच्या सहाय्याने ही स्कुटर 18 मिनिटात 50 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!