दलित सरपंचाने झेंडा फडकविल्याने पूर्ण कुटुंबाला मारहाण ….राष्ट्रीय एससी आयोगाने मध्यप्रदेशच्या मुख्य सचिव व डीजीपीकडून उत्तर मागविले
नवी दिल्ली,
दलित सरपंचाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा फडकविल्याने ग-ाम सचिवाने सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप लावले गेले. या प्रकरणाची दाखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपलानी मध्यप्रदेशचे मुख्य सचिव आणि डीजीपीना नोटिस जारी करुन तत्काळ अॅक्शन टेकन रिपोट (तत्काळ कारवाईचा अहवाल) सादर करण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील छतरपुरमधील ओरछा रोडवरील धामचीचे सरपंच अन्नू बसोरानी 15 ऑगस्टला गावामध्ये स्वातंत्र्य दिवसाच्या संबंधात एक कार्यक्रम केला. ज्यात झेंडा फडकविण्याच्या कार्यक्रमात ग-ाम सचिव सुनील तिवारीना मुख्य पाहुणे म्हणून बोलावले होते.
आयोगाला पीडित सरपंचाने सांगितले की ग-ाम सचिव कार्यक्रमामध्ये वेळेवर पोहचू शकले नाहीत त्यामुळे कार्यक्रमातील उपस्थित गणमान्य व्यक्ती व गांवातील रहिवाश्यांच्या आग-हावरुन त्यांनी झेंडा फडकविला. या दरम्यान ग-ाम सचिवाने सार्वजनिक ठिकाणावर सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या मध्येच माझ्या व माझ्या कुटुंबाला मारहाण केली तसेच मला जातीवाचक शब्दांचा वापर केला.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मध्य प्रदेशचे मुख्य सचिव व डीजीपी बरोबरच छतरपूर जिल्ह्याचे उपनियंत्रक व जिल्हा पोलिस अघिक्षकाना लिहिले की या प्रकरणाचा तत्काळ तपास करुन कारवाईचा अहवाल सादर करावा .जर आयोगाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही तर जिल्हाधिकार्यांना नवी दिल्लीतील आयोगाच्या न्यायालयात बोलावले जाईल.