भारत जागतीक शांतीची इच्छा करतो – मीनाक्षी लेखी
नवी दिल्ली,
अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या संकटावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रिय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखीनी म्हटले की भारत जागतीक शांतीची इच्छा करत आहे.
आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केल्यानंतर दिल्ली भाजप प्रदेश कार्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रिय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखीनी अफगाणिस्तानमधील संकटा बाबत सोमवारी म्हटले की भारत जागतीक शांतीची इच्छा करत असून आम्हांला वाटते की प्रत्येक देशाने शांतीने पुढे जावे हीच आमची इच्छा आहे.
भाजप नेत्यांनी अफगाणिस्तान संकटावर टिपणी करण्यास नकार दिला परंतु एका वरीष्ठ पदाधिकार्याने म्हटले की भारत सरकारचा जो दृष्टिकोण असेल तोच पक्षाचा दृष्टिाकोण असेल.
तर एका अन्य नेत्याने म्हटले की, भारत सरकारने देश हिताच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक पावली उचली पाहिजेत.
या दरम्यान समोर आलेल्या बातम्यांनुसार सोमवारी काबुल विमानतळावर कमीत कमी पाच लोकांचा मृत्यू झाला आणि तीन स्टोवावेचा विमानातून खाली पडल्याने मृत्यू झाला. अराजक स्थितीच्या दरम्यान हजारो अफगाणि नागरीक देशातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
अफगाणिस्तानच्या नागरीक उड्डायन प्राधिकरणाकडून सोमवारी प्रसिध्द एका निवेदनात म्हटले गेले की तालिबानच्या ताब्याने व्यापक अराजकतेला पाहता काबुलमधील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सर्व वाणिज्यीक उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे.
प्राधिकारणाला दिसून आले की अराजक स्थितीमध्ये विमानतळावर यात्रेकरुच्या मोठया गर्दीमुळे लुटपाट आणि अन्य अव्यवस्थित स्थितीचे कारण बनू शकते आहे. एका निवेदनात लवकरच सामान्य स्थिती बाबतची आशा व्यक्त केली गेली.
या दरम्यान तालिबानने एका निवेदनात काबुलच्या रहिवाश्यांना म्हटले की त्यांचे जीवन आणि संपत्ती सुरक्षीत आहे आणि ते आपले काम सुरु ठेवू शकतात.
आंतरराष्ट्रीय समुदय समर्थित अफगाणिस्तानमधील सरकार पडल्यानंतर तालिबान रविवारी राजधानी काबुलमध्ये घुसला आणि राष्ट्रपती अशरफ गनी देशातून पळून गेले यामुळे दोन दशकाच्या अभियानाचा आश्चर्यजनक अंत झाला. यामध्ये अमेरिका व त्यांचे सहयोगीनी देशाला बदलण्याचा प्रयत्न केला होता.