दक्षिण अफ्रिका मालिकेच्या आधी लंकेचा कुसल परेरा कोरोना पॉझिटिव्ह
कोलंबो,
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुसल जेनिथ परेरा पुढील महिन्यात दक्षिण अफ्रिके विरुध्द खेळण्यात येणार्या मालिकेच्या आधी कोविड-19 नेे संक्रमित आढळून आला आहे.
श्रीलंका संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल परेरा कोलंबोमध्ये दक्षिण अफ्रिके विरुध्द होणार्या मालिकेसाठी प्रशिक्षण सुरु होण्याच्या आधी खेळाडूंच्या केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आला.
जूनमध्ये इंग्लंड दौर्याच्या दरम्यान श्रीलंंका संघाचे नेतृत्व करणारा परेरा खाद्यांच्या जखमेच्या कारणामुळे मागील महिन्यात स्वदेशात भारता विरुध्द खेळण्यात आलेल्या एकदिवशीय व टि-20 मालिकेत खेळू शकला नव्हता. तो 2 सप्टेंबर पासून दक्षिण अफ्रिके विरुध्द खेळण्यात येणार्या मालिकेसाठी सराव शिबीराला सुरु करण्याची तयारी करत होता.
श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने एका निवेदनात म्हटले की कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर परेराला कोविड-19 शी संबंधीत वैद्यकिय मानकांनातून जावे लागत आहे. एसएलसीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की परेराला राष्ट्रीय संघात सामिल होण्याच्या आधी सरकारच्या क्वारंटाईन नियमांचे पालन करावे लागेल.
तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापसी करण्यासाठी खाद्यांच्या जखमेतून पूर्णपणे सावरला आहे का नाही याला मात्र दुजोरा मिळालेला नाही. दक्षिण अफ्रिके विरुध्दच्या मालिकेसाठी तयार होण्यासाठी संघ 25 ऑगस्टच्या दरम्यान बायो बबलमध्ये प्रवेश करेल.
श्रीलंकेला 2 ते 14 सप्टेंबरच्या दरम्यान कोलंबोमध्ये दक्षिण अफ्रिकेच्या विरुध्द तीन एकदिवशीय आणि तीन टि-20 सामने खेळायचे आहेत.