किंग्स्टन कसोटी : वेस्टइंडिजचा पाकिस्तानवर रोमांचक विजय
किंग्स्टन (जमैका),
केमार रोचच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर सोमवारी वेस्टइंडिजने पाकिस्तानला रोमांचक सामन्यात एक गडी राखून पराभूत करुन दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
सामन्यात वेस्टइंडिजच्या केमार रोचने जेडेन सील्स बरोबर शेवटच्या गडयासाठी 17 धावांची भागेदारी केली. या दरम्यान जेडेनने नाबाद दोन धावा केल्या. रोचने आपल्या तीस धांवासह कसोटीतील आापल्या एक हजार धावा पूर्ण केल्या. रोच 1 हजार धावा आणि 200 पेक्षा अधिक गडी बाद करणार्या वेस्टइंडिज खेळाडूंच्या एलीट क्लबमध्ये सामिल झाला.
वेस्टइंडिजला विजयासाठी पाकिस्ताने शेवटच्या डावात 168 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्टइंडिजने चहापाण्या पर्यंत 7 गडी गमवून 114 धावा केल्या होत्या. यानंतर रोचने बाकीच्या फलंदाजांसह मिळून संघाला विजया पर्यंत पोहचविले.
सामन्यानंतर रोचने म्हटले की माझी योजना सकारात्मक होती आणि मी फक्त प्रत्येक चेंडूला त्याच्या मेरिटवर खेळत होतो. हा माझा आता पर्यंतचा सर्वांत शानदार डाव आहे. मी फक्त गॅपमध्ये खेळत होतो आणि धावा करण्याचा प्रयत्न करत होतो. मी जेडेनला ऐवढेच म्हटले की त्याने आपली विकेट वाचवत खेळावे आणि त्यानेही शानदार खेळ दाखविला. जेडेन भविष्यातील उभरता तारा आहे त्याने जसे की पाच गडी बाद केले तेही प्रशवंसनीयच आहे. मी त्याला आगमी सामन्यासाठी अनेक शुभेच्छा देतो आहे.
जेडेन सील्सने सामन्यात 125 धावा देऊन आठ गडी बाद केले. यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. तो कसोटीमध्ये पाच गडी बाद करणारा सर्वात कमी वयाचा वेस्टइंडिजचा खेळाडू बनला आहे.