राशिदला आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात अडचणी – पीटरसन

लंडन,

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आपल्या देशातील स्थिती बाबत चिंतीत असून आपल्या कुटुंबाला तेथून बाहेर काढण्यासाठी अडचणीचा सामना करत आहे असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने व्यक्त केले.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर वर्तमान संकटाच्या कारणामुळे काबुलमधील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानळावरुन जगभरातील प्रवासी विमानांचे संचालन बंद करण्यात आले आहे. रविवारी तालिबानने देशावर कब्जा केला असून त्यानंतर कोणतेही उड्डाण हवाई क्षेत्रावरुन उड्डाण करु शकले नाहीत. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनीनी राजीनामा देऊन देश सोडला आहे.

पीटरसनने स्काय स्पोर्टसला सांगितले की अनेक गोष्टी आहेत ज्या तेथे होत आहेत आणि आम्ही या बाबत मोठी चर्चाही केली आहे व राशिद या बाबत चिंतीत आहे. तो आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानमधून बाहेर आणू शकत नाही आणि यासाठी ही वेळ त्याच्यासाठी खूप कठिण आहे.

त्याने पुढे म्हटले की राशिद इतक्या दबावामध्ये असतानाही इतके शानदार प्रदर्शन करत आहे त्याचे हे द हंड्रेडसाठी खूप प्रेरणादायक आहे.

राशिद बि-टेनमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेडच्या उद्घाटन हंगामामध्ये ट्रेंट रॉकेटससाठी खेळत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!