विराट कोहलीच्या बॅटिंग अप्रोचवर सुनील गावसकरांनी उठवला सवाल

मुंबई,

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. विराट धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने अखेरचे शतक 2019 मध्ये ठोकलं होतं. इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या कसोटी मालिकेतील 4 डावात विराटला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. लॉर्डस् कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात विराट कोहलीने शानदार सुरूवात केली होती. पण तो मोठी खेळी साकारू शकला नाही आणि त्यांची कमजोरी समोर आली. या दरम्यान, भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर, विराटच्या बॅटिंग अप्रोचवर नाखूश दिसले. त्यांनी विराटला कसोटी फॉर्मेटमध्ये व्ही सेफमध्ये खेळण्याचा सल्ला दिला.

गावसकर म्हणाले की, व्ही सेफ विराटसाठी उपयुक्त ठरला आहे. बॅक आणि मूव्हमेंटसोबत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. पण तो ऑॅफ स्टम्पपासून बाहेर जाणार्‍या चेंडूवर लवकर खेळण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान, त्याचे पाय कुठं तर बॅट कुठं असल्याचे दिसते. ज्यामुळे तो त्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने खेळू शकलेला नाही.

मला वाटत की, प्रत्येक फलंदाजाला त्याची स्वत:ची टेकनिक शोधण्यासाठी एकटं सोडलं पाहिजे. हा कसोटी सामना आहे. एकदिवसीय आणि टी-20 सामन्याची परिस्थिती एकदम वेगळी असते. पण कसोटीत तुम्हाला व्ही सेफमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे देखील गावसकर म्हणाले.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक अवस्थेत पोहोचला आहे. भारताने चौथ्या दिवसाअखेर 6 बाद 181 धावा केल्या आहेत. भारताकडे 154 धावांची आघाडी झाली आहे. अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ॠषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर खेळत होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!