विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान ने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लॉन्च केलेल्या गिताचे प्रकाशन
रावेर प्रतिनिधी : – ( प्रदिप महाराज )
सुना सावखेडा येथील हनुमान मंदिरावर आदरणीय भक्तीकिशोरदासजी यांच्या हस्ते विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान ने अखिल भारतीय स्तरावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लॉन्च केलेल्या देशभक्तीपर गीताचे पुन्हा प्रकाशन करण्यात आले विद्या भारती चे
जिल्हा मंत्री निलेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्याभारतीच्या देशभरात तीस हजार पेक्षा अधिक विद्यालय असून कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरच्या लेह लद्दाख पर्यंत विद्या भारती चे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्याभारती च्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक आय ए एस, आयपीएस, व सर्व वर्गांचे अनेक अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांच्या हातून देशाच्या सेवेत हातभार लागत आहे, अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण करत असताना विद्यार्थ्यांनी मातृभाषेतूनच शिक्षण घेतलंच पाहिजे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण कायद्यानुसार भविष्यात सर्व प्रकारच्या शिक्षणात मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह आहे. असे प्रतिपादन केले .
शास्त्रीजींनी त्यांच्या मनोगतात मूल्याधिष्ठित कालसुसंगत शिक्षण प्रणाली म्हणजेच विद्याभारती असं म्हटलं; शिक्षणातून भारताचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना माहीत झाला पाहिजे व हे कार्य विद्याभारती च्या माध्यमातून होत असल्याचे समाधान व्यक्त केले; आगामी काळातही विद्याभारतीच्या माध्यमातून देशावर प्रेम करणारे विद्यार्थी घडत राहत व भारतीय संस्कृतीची अशीच जोपासना होत राहो या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम प्रसंगी संजयजी सराफ जेष्ठ कार्यकर्ते फैजपूर विद्या भारती चे जिल्हा कार्यकारणी सदस्य सोहन महाजन ( स्वदेशी विषय )तुषार महाजन ( संस्थाचालक समन्वय )व योगेश पवार (भाग प्रमुख डोंबिवली )उपस्थित होते.