आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी पारोळा व एरंडोल तालुक्यातील जलसंधारणासाठी १३ कोटी मंजूर
पारोळा प्रतिनिधी
मतदारसंघातील विविध नद्या, नाले यांच्यावर छोटे सिमेंट बंधारे तयार करून त्या परिसरातील सिंचन पातळी वाढावी व विहिरींना कायम पाणी रहावे, याअनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. मतदारसंघात अनेक छोटे – मोठे नाले आहेत. पावसाळ्यात यांच्यातील पाणी वाहून नद्यांना मिळते. या भागात सिमेंट बांध तुरळक प्रमाणात आहेत. ते देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक वर्षांपासून पारोळा व एरंडोल तालुक्याला पाणी टंचाईचा काळात दुष्काळाचा सामना करावा लागतो. यासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते, सरपंच, स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून विविध गावांना बंधारे कसे घालता येथील यासाठी आधी अधिकाऱ्यांमार्फत सर्वे करून त्यानुसार हे बंधाऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. याची मृद व जलसंधारण मंत्री यांनी त्वरित दखल घेऊन पारोळा व एरंडोल तालुक्यातील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या १४ साठवण बंधाऱ्यांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद अंतर्गत योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. लवकरच या कामांना गती मिळणार असून यामुळे मतदारसंघातील गावामधील शेतातील सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी देखील लाभ होणार आहे. मंजुरी मिळालेल्या गावातील ग्रामस्थांनी आमदार चिमणराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या ठिकाणी होणार सिमेंट बांध व त्यांची मंजूर रक्कम
रताळे १ – ५१ लक्ष ८३ हजार, रताळे २- ४५ लक्ष ४३ हजार, रताळे ३ – ६० लक्ष १९ हजार, वडगांव प्र.अ.१- ५३ लक्ष १८ हजार, वडगांव प्र.अ.२- ३८ लक्ष ७३ हजार, वडगांव प्र.अ.३- ४० लक्ष ८ हजार, मेहू २ – ४३ लक्ष ११ हजार, करमाड बु १- ५० लक्ष ६९ हजार, करमाड खु १ – ४२ लक्ष ४२ हजार, करमाड खु २- ४२ लक्ष ६६ हजार, करमाड खु ३- ३९ लक्ष ८ हजार, टोळी – १ कोटी ४ लक्ष ६१ हजार, आडगांव – ४० लक्ष ३३ हजार, मोंढाळे १ – ५९ लक्ष ५२ हजार, मोंढाळे २ – ८१ लक्ष ५४ हजार, मोंढाळे ३- ५९ लक्ष ७७ हजार, मोंढाळे ४ – ९२ लक्ष २५ हजार, मोंढाळे ५ – ७४ लक्ष ३१ हजार, मुंदाणे प्र.ऊ. – १ कोटी ४० लक्ष ८७ हजार, मालखेडा – ६४ लक्ष ५६ हजार.