राष्ट्रपतींचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन; कोरोना लस, कृषी, जम्मू काश्मीरसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य

नवी दिल्ली,

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. कोरोना महामारीचा संदर्भ देत ते म्हणाले की कोरोना साथीची तीव-ता कमी झाली आहे पण कोरोना विषाणूचा प्रभाव अजून संपलेला नाही. सर्व जोखीम घेत, कोरोनाची दुसरी लाट आमच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, प्रशासक आणि इतर कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रित केली जात आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी अल्पावधीत कोरोनाची लस तयार केली, असंही राष्ट्रपतींनी म्हटलं.

सर्व देशवासियांना मी विनंती करतो की प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी आणि इतरांनाही प्रेरित करावे. यावेळी लस हे आपल्या सर्वांसाठी विज्ञानाने प्रदान केलेले सर्वोत्तम संरक्षण आहे. मी सर्व देशवासियांना विनंती करतो की प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटल. वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी एका वर्षाच्या कालावधीत 23,220 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, हेआनंददायक आहे, असंही त्यांनी म्हटलं.

पुढे रामनाथ कोविंद यांनी म्हटलं की, मला आनंद आहे की सर्व अडचणी असूनही, ग-ामीण भागात, विशेषत: शेतीमध्ये प्रगती सुरु आहे. कृषी मार्केटिंगमध्ये केलेल्या अनेक सुधारणांमुळे, आमचे अन्नदाता शेतकरी अधिक सशक्त होतील आणि त्यांना त्यांच्या उत्पादनांची चांगली किंमत मिळेल.

जम्मू -काश्मीरमधील रहिवाशांना, विशेषत: तरुणांना या संधीचा लाभ घ्या आणि लोकशाही संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या आकांक्षा साकार करण्यासाठी सक्रिय व्हावे, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. आता जम्मू -काश्मीरमध्ये एक नवीन जागरुकता दिसत आहे. सरकारने लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणार्‍या सर्व पक्षांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असंही त्यांनी म्हटलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!