जीएमबी घोटाळा : ईडीने एएनएलची 134 कोटी रुपयांची संपत्ती कुर्क केली

नवी दिल्ली

गुजरात मॅरीटाइम बोर्ड (जीएमबी) घोटाळ्यात आताश नॉरकंट्रोल लिमिटेड (एएनएल) ची 134 कोटी रुपयांची संपत्ती कुर्क केली असल्याची माहिती केंद्रिय प्रवर्तन निदेशालय (ईडी) च्या अधिकार्‍यांनी शनिवारी दिली.

ईडीच्या एका अधिकार्‍याने सांगितले की संस्थेने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्टच्या तरतुदी अंतर्गत आताश नॉरकंट्रोल लिमिटेडची 134.38 कोटी रुपयांची संपत्ती कुर्क केली आहे.

त्यांनी म्हटले की कुर्क करण्यात आलेली संपत्ती प्लँट, यंत्रसामुग-ी, कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, जमिन आणि भवनाच्या रुपात 90.62 कोटी रुपये आणि बँक बँलेंस 43.75 कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिटच्या रुपात आहे.

अधिकार्‍याने म्हटले की आताश नॉरकंट्रोल लिमिटेड हा एक भारतीय कंपनी आताश कॉम्प्युटर्स अँड कम्युनिकेशंस प्राइव्हेट लिमिटेड आणि नॉर्वेमधील कोंग्सबर्ग नॉरकंट्रोल आयटी एएसमधील एक संयुक्त उद्यम आहे.

ही कंपनी वेसल ट्रॅफिक अँड पोर्टस मॅनेजमेंट सिस्टीम (व्हीटीपीएमएस) च्या निर्माण आणि संचालनात काम करत आहे आणि हे जहाजांना नेव्हिगेशन सेवा प्रदान करत आहे.

अधिकार्‍याने सांंगितले की ईडीने गुजरात मॅरीटाईम बोर्ड (जीएमबी) मध्ये 134.38 कोटी रुपयांच्या धोकाधडी करण्याच्या आरोपामध्ये आताश नॉरकंट्रोल लिमिटेड (एएनएल) आणि अन्यच्या विरोधात गांधीनगरमध्ये सीआयडी-क्राइमद्वारा नोंदविलेल्या प्राथमिकीच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे.

त्यांनी म्हटले की मनी लॉन्ड्रिंग तपासातून माहिती पडले की एएनएलला खंभातच्या खाडीसाठी वेसल ट्रॅफिक अँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (व्हीटीपीएमएस) च्या निर्माण आणि संचालनासाठी जीएमबीद्वारा एक करार दिला गेला होता. मात्र एएनएलने जीएमबीला परियोजनेसाठी जास्तीचे दर सादर केले आणि अशा प्रकारे जहाजांच्या नेव्हिगेशनसाठी उच्च टॅरिफ दरांना निश्चित करण्यासाठी जीएमबीला फसविले. व्हीटीपीएमएस पायाभूत रचना ऑगस्ट 2010 मध्ये चालू झाली आणि त्यानंतर एएनएलने सवलत करारानुसार जहाजांकडून व्हीटीएस शुल्क एकत्र करण्यास सुरुवात केली.

अधिकार्‍याने सांगितले की परियोजनेतील खोटी व मनगंढत गुंंवणुकीचा सहारा बाबत एएनएलला संबंधीत कालावधीच्या दरम्यान 134.38 कोटी रुपयांचा अतिरीक्त देणी प्राप्त झाल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!