पंजाब राज्यात प्रवेश करण्यासाठी लशीकरण किंवा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य
चंदीगड,
पंजाब राज्यात सोमवार पासून प्रवेश करणार्या सर्व लोकांसाठी कोविड-19 प्रतिबंधांचे पूर्ण लशीकरण किंवा निगेटिव्ह आरटी-पीसीआर अहवाला असणे अनिवार्य करण्याचा आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहनी दिला आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंहनी या संबंधात शनिवारी आदेश प्रसिध्द केला आणि सोमवार पासून राज्यात प्रवेश करणार्या सर्व लोक विशेष करुन शेजारील राज्य हिमाचल प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमधून येणार्यांवर कडक देखरेखर करण्यास सांंगितले आहे. येथे मागील दिवसांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ पाहिला मिळाली आहे.
शाळेमध्ये कोविड-19 रुग्ण आढळून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की फक्त पूर्णपणे लस घेतलेले शिक्षक आणि शिक्षकत्तेर कर्मचारी किंवा जे नुकतेच कोविड-19 मधून बरे झाले आहे त्यांनीच शाळेत व महाविद्यालयात शारिरीकपणे येऊन शिकविले पाहिजे. याच बरोबर सर्व मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे.
त्यांनी पुढे लशीकरणासाठी शिक्षक आणि गैर शिक्षण कर्मचार्यांना प्राथमिकता देण्याचा आदेश दिला असून मुख्यमंत्र्यानी विशेष शिबीरांसह हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की याला महिन्याच्या आत सर्वांना पहिला डोजसह कव्हर केले जावे आणि ज्यांना पहिला डोज दिला गेला आहे त्यांना दुसर्या डोजसाठी प्राथमिकता दिली जावी.
आरोग्य मंत्री बलवीर सिंह सिध्दूने शिक्षक आणि अन्य शालेय कर्मचार्यांसाठी लशीचा दुसर्या डोजला प्राथमिकता देण्यासाठी दोन डोजमधील अंतराला कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंहच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड-19 आढावा बैठकीनंतर हे निर्देश दिले गेले आहेत. त्यांनी हिमाचल प्रदेश आणि देशातील अन्य भागात वाढत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णां बाबत चिंता व्यक्त केली. याच कारणामुळे पंजाबमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण संख्या मागील आठवडयात किरकोळपणे 0.2 टक्क्या पर्यंत वाढली आहे आणि रिकव्हरी रेट (आरओ) 1.05 टक्के नोंदविला गेला आहे.
केंबि-ज विद्यापठाच्या आभ्यासामध्ये ही भविष्यवाणी करण्यात आली की पुढील 64 दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यांनी पहिल्या पासून लागू प्रतिबंधांच्या व्यतिरीक्त नवीन प्रतिबंधाच्या घोषणावर जोर देण्याचा इशारा दिला.
मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दिवशी शाळेतील विद्यार्थी व कर्मचार्यांचे कमीत कमी दहा हजार परिक्षण नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्या जिल्ह्यात आणि शहरात पॉझिटिव्हीटी रेट 0.2 टक्क्यांच्यावर आहे तेथील स्थितीमध्ये सुधार होई पर्यंत वर्ग 4 थी व त्याखालील वर्गासाठी शारिरीकपणे शिक्षण बंद करण्यास सांगितले आहे.