राहुल गांधींचे टिवटर अनलॉक; काँग-ेस पक्षाचे आणि नेत्यांचे अकाऊंटही पुन्हा सुरु
नवी दिल्ली
काँग-ेस नेते राहुल गांधी यांचे टिवटर अकाऊट एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा सुरु करण्यात आलं आहे. सोबतच काँग-ेस पक्ष आणि इतर महत्वाच्या नेत्यांचे टिवटर अकाऊंटही सुरु झाले आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो टवीट केला होता. त्यामुळे आपल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत टिवटरने त्यांच्या अकाऊंटवर कारवाई केली होती.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो टवीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर टिवटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते. नंतर टिवटरने त्यांचे अकाऊंट तात्पुरतं निलंबित केलं होतं.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो टवीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर टिवटरनं राहुल गांधी यांचं ते टवीट हटवलं होतं. त्यांचं टिवटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने टिवटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.
टिवटर हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असून भारतीय लोकशाहीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता
टिवटर आपल्या धोरणांबाबत निष्पक्षपणे काम करतं. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे फोटो शेअर करणार्या सर्वांवर टिवटरकडून कारवाई करण्यात आली आहे आणि या पुढेही सुरु राहिल. व्यक्तीच्या खासगीपणाला आणि सुरक्षेला टिवटरकडून सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं.
कंपनीच्या धोरणानुसार, एखादे टवीट हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि अजूनही ते टवीट डिलीट केलं नसेल तर संबंधित अकाऊंट आम्ही तात्पुरत्या स्वरुपात बंद करु शकतो.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन पीडितेच्या पालकांची ओळख टिवटवरुन जाहीर केल्याबद्दल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आम्हाला कळवलं होतं. या गोष्टीमुळे कंपनीच्या नियमांचे आणि भारतीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यानंतर टिवटरने काही टिवटर अकाऊंट निलंबित करण्याचा निर्णय घेतला.