रावेर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनी झाला योद्धांचा सन्मान
प्रतिनिधी- प्रमोद कोंडे.
आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्त रावेर येथे तहसिल विभागा तर्फे कोरोना काळात सामाजिक बांधिलकी ठेऊन जिवाची पर्वा न करता निर्भीड पणे आपले कर्तव्य बजावले म्हणून निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पाटील , आरोग्य सेवक कैलास महाजन, आरोग्य सेविका सौ.आर.एम. खाचणे, आशा स्वयंम सेविका सौ. सुनीता राजीव बोरसे, आशा सेविका सौ. उषा महाजन यांना सन्मान पत्र देऊन गौरव तहसीलदार उषाराणी देवगुणे ,रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक ,नायब तहसीलदार व मान्यवरांनी केला .याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. कविता कोळी,पं. स .सदस्य सौ. योगिता वानखेडे , जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे यासह मान्यवर उपस्थित होते.तसेच पंचायत समिती तर्फे रावेर येथे पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. व त्यानंतर निंभोरा येथील जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती सौ. कविता कोळी, उपसभापती सौ. धनश्री सावळे ,गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल ,पं .स. सदस्या सौ. योगिता वानखेडे, हरीलाल कोळी ,गोपाळ नेमाडे ,योगेश पाटील, संदीप सावळे ,रावेर येथील सर्व पत्रकार बांधव व आदी मान्यवर उपस्थित होते.