जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कडून महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण.

नवी दिल्ली 15 AUG 2021

व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट त्यांच्या एका कंटेनर हाताळणी बंदरामध्ये स्त्रियांसाठी व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. शिक्षण कार्यक्रमाला जनशिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे. 

जवाहरलाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते मुंबईत न्हावा शेवा ग्रामपंचायत येथे या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ने सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत पन्नास लाख रुपये रायगड जिल्ह्यातील 1000 जणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी मंजूर केले.

तीन महिने चालणार असलेल्या या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा भर कौशल्य विकासावर, तसेच स्त्रियांना व्यावसायिक कौशल्ये अवगत होऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना पुढेही मदत मिळत राहावे यावर आहे. या शिक्षणक्रमात सौंदर्य साधना , शुश्रूषा, नर्सिंग होमसाठी मदतनीस, सॅनिटरी पॅड बनवणे, भाजी व मासे सुकवणे, वारली पेंटिंग अगरबत्ती पॅकेजिंग अशी कौशल्ये समाविष्ट आहेत

पहिल्या टप्प्यात जन शिक्षण संस्थेने जवाहरलाल पोर्ट ट्रस्टच्या मदतीने एकूण 18 शिक्षणक्रमांचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील 450 लाभार्थ्यांना दिले.

या उपक्रमाच्या आत्ताच्या टप्प्यात चारशे लाभार्थ्यांना सोळा विविध शिक्षणक्रमांचे प्रशिक्षण मिळेल . याशिवाय उरण तालुक्यातील 5 तुकडयांचाही समावेश यात आहे.

जन शिक्षण संस्था ही कौशल्य विकास आणि नवोद्योजकता मंत्रालयाशी संलग्न असलेली स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था कौशल्य विकास आणि रोजगार निर्माण कार्यक्रमात पंधरा वर्षांहून जास्त काळ सक्रिय आहे.

जन शिक्षण संस्थेने 40 पेक्षा जास्त प्रकारचे व्यवसायिक प्रशिक्षक कार्यक्रम राबवले असून आत्तापर्यंत 28 हजारहून जास्त जणांनी प्रशिक्षण घेतले आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!