वन विभागाने धरणगाव- जळगाव रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ भरकटलेल्या मोरांना दिले जीवदान.

धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान.

जळगाव रस्त्यावरील श्री साई वंदन क्लिनिंग अंड ग्रेडिंग समोर एका झाडावर आज शनिवार रोजी सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दोन मोरांनी बस्तान मांडलेले होते. दिवसभर परिसरात सैर वैर भरकटत ते पुन्हा याठीकानाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर येवून बसत. धरणगाव शहरातील हॉटेल मयूर चे मालक तथा लहान माळी वाडा येथील रहिवासी बापू चौधरी यांना ते निदर्शनास आले. धरणगाव जळगाव रस्त्यावर या मोरांचा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाखाली आल्याने अपघात होवून मोरांच्या जीवितास धोका असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली.

वन विभागाचे कर्मचारी यांनी तत्काळ प्रत्यक्ष स्थळ गाठून या दोन मोरांना पकडले. या मोरांना संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पकडण्यात आले. वन विभागाचे कर्मचारी क्षीरसागर साहेब यांनी हे दोन मोर नर असल्याचे सांगितले तसेच यांना वन विभागाच्या जंगलात म्हनकाळे शिवारात सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिवसभर भरकटणाऱ्या या मोरांना जीवदान मिळाल्याचा आनंद यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!