दोनगावं मध्ये तात्काळ दारूबंदी करा शिवसेनेची मागणी.

दोनगाव प्रतिनिधी

दोनगाव मध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी दारू च्या आहारी जात असुन गावातील शांतता आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे गावातील अनेक माता भगिनी त्रस्त आहेत. गावात अनेक वर्षांपासून दारू बंदी होती परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणात दारु विक्री सुरू आहे. सदर दारू विक्री ताबडतोब बंद होण्यासाठी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी पाळधी पोलिस स्टेशन चे सहा. पोलिस निरीक्षक यांना आज रोजी निवेदन दिले. दारू विक्री बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांच्या सोबत निवेदन देण्यासाठी किशोर पाटील , भाऊसाहेब सुरेश पंढरीनाथ पवार उपसरपंच , जितेंद्र पाटील माजी उपसरपंच , ज्येष्ठ शिवसैनिक अरूण पाटील , युवा नेता अमोल विजय पाटील , नरेंद्र अहिरे , पोलिस पाटील मच्छिंद्र अप्पा , इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!