निंभोरा स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक योगेश शिंदे यांचे कौतुकास्पद कामगिरी.

खिर्डी प्रतिनिधी:-

निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी 2018- 2019 मध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे कार्यरत असताना 185/2018 भादवि कलम 302, 504, 506 ,34 प्रमाणे गुन्ह्याचा तपास केला होता व सदर गुन्ह्यातील तिघा आरोपी यांना अटक केली होती, सदर गुन्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी मा. जिल्हा सत्र न्यायाधीश ठुबे साहेब जळगाव यांनी निकाल दिला असून त्यामध्ये आरोपी दोषी ठरवण्यात येऊन शिक्षा लावण्यात आलेली असुन 304 (2) मध्ये साडे सात वर्ष कारावास व प्रत्येकी तीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दीड वर्ष कारावास तसेच 323 कलम यामध्ये दोषी ठरवून सहा महिने साधी कैद व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा तसेच 506 मध्ये दोषी ठरवून एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड आकारण्यात येऊन दंड न भरल्यास सहा महिने कैद व नातेवाईकांना 75 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश केला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी केलेला असून त्यांना मदतनीस म्हणून संदीप पाटील नेमणूक MIDC पोलीस स्टेशन हे होते,सदरचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो जळगाव, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सो जळगाव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. जळगाव व पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे सध्या नेमणूक निंभोरा पोलीस स्टेशन यांनी योग्यरीतीने करून आरोपी यांना शिक्षा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे असे दमदार निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश शिंदे साहेब सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!