गावठाण विस्तारासाठी गोरगरीब , मजुर, तसेच गरजु ज्यांच्याकडे घर नाही, अशा व्यक्तींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी .
निंभोरा.बु।।- प्रमोद कोंडे.
सकस आहाराची बखळ जागा क्र.730. सदर ही जमिन महाराष्ट्र शासन सकस आहार योजनेसाठी दिलेली असुन ती त्यांच्याच नावावर आहे. तसेच सदर जागा गावठाण विस्तारासाठी विचाराधीन असल्याने या व इतर असलेल्या जागा गोरगरीब गरजु लोकांना देण्यात यावी. आणि 300.स्केअर फुटप्रमाणे आठ अ भोगवट्यानुसार देण्यात येऊन विकास कामासाठी प्रत्येक लाभार्थांकडुन 3000 रु.देणगी स्वरुपात घ्यावी.
ग्रामपंचायत मार्फत ज्यांच्या कडे स्वतः चे घर नाही अशा व्यक्तींना शासन, ग्रामपंचायत प्लॉट उपलब्ध करून देणार आहे, ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या प्लॉटी मध्ये नावं समाविष्ट करण्याबाबत तसेच सदर ज्यांचे वास्तव्य निंभोरा गावामध्ये 20 ते 25 वर्षांपासून आहे. व त्यांचे रेशन कार्ड आहे, मतदार यादीत नावं आहे. आणि जे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांचे मालकीचे घर, प्लॉट कुठेही नाही. अशा व्यक्तींना पंतप्रधान घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे नावं घरकुल यादीत समाविष्ट करण्यात यावे. असे निवेदन, अर्ज, सामाजिक कार्यकर्त्ये शरद पितांबर तायडे यांनी निंभोरा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक गणेश पाटील, सरपंच सचिन महाले यांना दिले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलशाद शेख, सौ.मंदाकिनी बऱ्हाटे, प्रशांत पाटील , प्रशांत महाले, आदी उपस्थित होते.