धरणगाव जागृत जनमंच ला पाणी पुरवठा विभागा कडुन सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल…पाणी पुरवठा अभियंता अनुराधा पाटील
धरणगाव प्रतिनिधी – हर्षल चौहान
धरणगाव शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी धरणगाव जन जागृत जनमंच ची स्थापना करण्यात आली आहे. जागृत जनमंच च्या वतीने आज मंगळावर रोजी सकाळी धरणगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागास भेट देवून शहरातील पाणी पुरवठ्याच्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी पाणी पुरवठा अभियंता अनुराधा पाटील यांची भेट जनमंच च्या वतीने घेण्यात आली.
सदर बैठकीत नगरपालिकेतील पाणी पुरवठ्याशी संदर्भातील विविध स्वरुपाची माहिती जाणून घेवून त्यावर काय उपाय योजना करण्यात येतील यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अभियंता पाटील यांनी पाणी पुरवठ्याशी सर्व माहिती, सर्वसाधारण व तांत्रिक मुद्दे, पाणी पुरवठ्याची क्षमता, जल शुद्धीकरण प्रकल्प इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती दिली. व धरणगाव जागृत जनमंच ला सर्वोतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रसंगी जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील, धरणगाव जागृत जनमंच चे जितेंद्र महाजन यांनी पाणी पुरवठा विभागातील समस्या सविस्तर जाणून घेतल्या व त्यात योग्य त्या बदल करण्याच्या सूचना पाणी पुरवठा अभियंता यांना केल्यात. धरणगाव जागृत जनमंच याबाबत सविस्तर अहवाल तयार करून तो अहवाल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी शिवराम पाटील यांनी दिली.रवठा विभागा कडुन सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल…धरणगाव पुरवठा अभियंता अनुराधा पाटील*
धरणगाव शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी धरणगाव जन जागृत जनमंच ची स्थापना करण्यात आली आहे. जागृत जनमंच च्या वतीने आज मंगळावर रोजी सकाळी धरणगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागास भेट देवून शहरातील पाणी पुरवठ्याच्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी पाणी पुरवठा अभियंता अनुराधा पाटील यांची भेट जनमंच च्या वतीने घेण्यात आली.
सदर बैठकीत नगरपालिकेतील पाणी पुरवठ्याशी संदर्भातील विविध स्वरुपाची माहिती जाणून घेवून त्यावर काय उपाय योजना करण्यात येतील यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अभियंता पाटील यांनी पाणी पुरवठ्याशी सर्व माहिती, सर्वसाधारण व तांत्रिक मुद्दे, पाणी पुरवठ्याची क्षमता, जल शुद्धीकरण प्रकल्प इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती दिली. व धरणगाव जागृत जनमंच ला सर्वोतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रसंगी जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील, धरणगाव जागृत जनमंच चे जितेंद्र महाजन यांनी पाणी पुरवठा विभागातील समस्या सविस्तर जाणून घेतल्या व त्यात योग्य त्या बदल करण्याच्या सूचना पाणी पुरवठा अभियंता यांना केल्यात. धरणगाव जागृत जनमंच याबाबत सविस्तर अहवाल तयार करून तो अहवाल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी शिवराम पाटील यांनी दिली.