बालिकेच्या उपचारासाठी सोनू सूदकडून आर्थिक मदतीचा हात

हैद्राबाद प्रतिनिधी,

सूद चॅरिटी फाउंडेशनच्या मदतीने अंकुरा हॉस्पिटलद्वारा एका गंभीर कुपोषीत अडीच वर्षीय मुलगी जी अ‍ॅनिमियाने पीडित होती तिच्यावर यशस्वीपणे उपचार केला गेला.

अंंकुरा रुग्णालयाचे वैद्यकिय निदेशक डॉ.श्रीनिधीनी म्हटले की अफीफा मरियमला मागील महिन्यात रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिच्या जखमेतून थांबून थांबून रक्त वाहत होते आणि कुपोषणासह गंभीर अ‍ॅनीमिया होता.

एक वर्षापूर्वी गरम असलेले तेल चूकीने तिच्या उजव्या टेम्पोरो, पार्श्विका भाग, उजवा हात, मान आणि मानेच्या जवळी भागामध्ये पडले होते. तिला तत्काळ एका स्थानिय रुग्णालयात नेण्यात आले तेथे तिला कोलेजन लावले गेले होते आणि एक आठवडयाच्या आत तिला सुट्टी दिली गेली होती.

रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला पापडी विकसीत झाली आणि यानंतर तिला परत त्याच रुग्णालयात भरती करण्यात आले. दुसर्‍यांदाही उजव्या बाजूला आणि डोक व मानेवर कोलेजन लावले गेले  मुलीला योग्य पर्याप्त आहार आणि पोषक तत्व न मिळाल्याने ती कुपोषीत झाली.

डॉक्टरांनी सांगितले की मुलीच्या आई-वडिलांकडे तिच्या उपचारासाठी पैसे नव्हते त्यावेळी त्यांनी अभिनेता सोनू सूदकडे संपर्क केला. सूदने मुलीच्या उपचारासाठी अंकुरा रुग्णालयाची शिफारस केली. ज्यावेळी मुलीला पुढील तपासणी आणि व्यवस्थापनासाठी अंकुरामध्ये भरती करण्यात आले त्यावेळी कमी वजनाच्या कारणामुळे तिची वैद्यकिंय स्थिती गंभीर आणि आव्हानात्मक होती.

त्यांनी सांगितले की डॉ.हरि किरणच्या नेतृत्वाखालील चोवीस तास मुलीला विशेष नर्सिंग देखभाल आणि विशेष डॉक्टर टिमकडून सेवा प्रदान करण्यात आली कारण सुरुवातीचे काही आठवडे पोषण, फुफुस आणि मेंदूची परिपक्वता आणि फिड स्थापित करण्यासाठी महत्वापूर्ण होते.

त्यांनी सांगितले की पूर्ण वैद्यकिय टिमद्वारा चार आठवडयांच्या विशेष देखभालीसह प्रगत उपकरणाची मदत. मानकीकृत उपचार प्रोटोकॉल, प्रमुख वैद्यकिय हस्तक्षेप आणि प्रक्रियाने मुलीला जीवंत राहण्यास मदत केली.

सोनू सूदने म्हटले की मला जीवन वाचविण्यापेक्षा इतर कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नाही. मी भुतकाळात अंकुरा रुग्णालया बरोबर कम केले आहे. महामारीच्या दरम्यान मी स्त्रीरोग आणि बाल रोगाच्या काही गंभीर रुग्णाना त्यांच्याकडे पाठविले आहे आणि त्यांनी उल्लेखनीय परिणाम दाखविला आहे. माझ्या विश्वासाला मजबूत केले आहे. अशा आरोग्य सेवे बरोबर  अधिक गंभीरतेने जोडण्याचा संकल्प करावा जे याचा प्रचार करतील

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!