देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

देशात इलेक्ट्रिक/हायब्रीड वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया अर्थात फास्टर ऍडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड ऍन्ड इलेक्ट्रिक व्हेईकल्स ही योजना 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची एक एप्रिल 2019 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू आहे आणि त्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या टप्प्यात सार्वजनिक आणि शेअर पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचे विद्युतीकरण आणि 7090 ई-बसेस, 5 लाख ई- तिचाकी, 55,000 ई- चारचाकी प्रवासी वाहने आणि 10 लाख ई- दुचाकी यांना अनुदानाचे पाठबळ देण्यावर भर दिला जात आहे. ई- दुचाकी, ई- तिचाकी आणि ई- चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या 38 ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सची (ओईएम) फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 9 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी झाली आहे. या वाहनांचे उत्पादक/मूळ सामग्री उत्पादक यांचे तपशील सोबतच्या तक्त्यात दिले आहेत.

Sl. No.YearNo. of electric vehicles
1.20181,31,554
2.20191,61,314
3.20201,19,648
4.2021 (till 19th July, 2021)1,04,806
Total5,17,322

रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात नोंदणी झालेल्या या इलेक्ट्रिक वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

CategoryName of Manufacturers
e-2W1Ampere Vehicle Pvt. Ltd.
2Ather Energy Pvt. Ltd.
3Benling India Energy & Technology Pvt. Ltd.
4Hero Electric Vehicles Pvt. Ltd.
5Jitendra EV Tech Pvt. Ltd.
6Li-ions Elecktrik Solutions Pvt. Ltd.
7Okinawa Auto Tech Pvt. Ltd.
8Revolt Intellicorp Pvt. Ltd.
9TVS Motor Company Ltd.
10M/s. Tunwal E-motors Pvt. Ltd
e-3W1Champion Polyplast
2Kinetic Green Energy and Power Solution Ltd.
3Mahindra Electric Mobility Ltd.
4Victory Electric Vehicles Intl. Pvt. Ltd.
5YC Electric Vehicle Pvt. Ltd
6Best Way Agencies Pvt. Ltd.
7Energy Electric Vehicles
8Thukral Electric Bikes Pvt. Ltd
9M/S Saera Electri Auto Pvt. Ltd
10Khalsa Agency
11Goenka Electric Motor Vehicles Pvt. Ltd.
12Atul Auto Ltd.
13Dilli Electric Auto Pvt. Ltd
14U P Telelinks Ltd
15Piaggio Vehicles Pvt. Ltd.
16Lohia Auto Industries
17Avon Cycles Ltd.
18Altigreen Propulsion Labs Pvt. Ltd.
19Keto Motors Pvt. Ltd.
20Omega Seiki Pvt. Ltd.
21Speego Vehicles Co. Pvt. Ltd.
22Etrio Automobiles Private Ltd.
23Grd Motors
24Om Balajee Automobile India Pvt Ltd
25Scooters India Limited
26Mlr Auto Ltd
e-4W1Mahindra & Mahindra
2Tata Motors

अवजड उद्योग राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!