नाबार्डकडून गोवा सरकारला ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीअंतर्गत 217.72 कोटी रुपयाचे सहाय्य मंजूर
पणजी, 10 ऑगस्ट 2021
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) गोवा सरकारला 2021-22 वर्षासाठी आतापर्यंत 217.72 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थापक उषा रमेश यांनी दिली. यात बांबोळी येथील रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विभागाच्या बांधकामासाठी 188.81 कोटी आणि साळगाव येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विस्तारासाठी कर्ज देण्यात आले आहे. राज्य सरकारांना जलसिंचन, मृदा संवर्धन आणि इतर ग्रामीण सामाजिक पायाभूत सुविधांसाठी नाबार्डकडून कर्जपुरवठा केला जातो.