जागतीकस्तरावर इंधनाच्या किंमतीतील घसरणीनंतरही ओएमसीकडून इंधन किंमती अपरिवर्तीत

नवी दिल्ली प्रतिनिधी

8ऑगस्ट

जागतीकस्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण सुरु झाल्यानंतरही भारतीय तेल वितरण कंपन्या (ओएमसी) नी रविवारी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदला केलेला नाही. देशात सलग 22 व्या दिवशीही इंधनाच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत.

जुलै महिन्यात जागतीकस्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती 70 डॉलर प्रति बॅरल खालीच्या स्तरावरुन सुरु होऊन 77 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहचल्या होत्या. परंतु नंतर महिन्यात परत एकदा 70 डॉलर प्रति बॅरल पर्यंत खाली आणि परंत चढून 75 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहचल्या आहेत. सध्यातरी इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजमध्ये ब-ेंट क्रूड ऑईलचा भाव ऑक्टोंबर कॉन्ट्रॅक्ट 70.70 डॉलर प्रति बॅरलवर आहे.

वाढते कोविड रुग्ण् संख्या, जागतीकस्तरावर ओद्योगिक सुधाराला मंद करणे आणि अमेरिकी तेल यादीतील वाढीच्या चिंतांवर तेलाच्या किंमतीमध्ये घसरण आली आहे .

भारतीय तेल वितरण कंपन्यानी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे शनिवारीही राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरच्या अपरिवर्तीत किंमतीवर विकले जात होते. या किंमती 18 जुलै पासून स्थिर राहिल्या आहेत.

मुंबई शहरामध्ये पेट्रोलची किंमत 29 मेला पहिल्यांदा 100 रुपयाच्या वर गेली आणि सध्या पेट्रोल 107.83 रुपये आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. जे देशातील इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक किंमती आहेत. सर्व महानगरांमध्ये पेट्रोलची किंमत आता 100 रुपये प्रति लिटरच्या वर पोहचल्या आहेत.

चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.49 रुपये आणि कोलकातामध्ये 101.08 रुपये प्रति लिटरवर पोहचल्या आहेत. तर डिझेलच्या किंमती या दोनीही महानगरामध्ये अनुक्रमे 94.39 रुपये आणि 93.02 रुपये प्रति लिटर राहिल्या आहेत.

चालू आर्थिक वर्षात इंधनाच्या किंमतीमध्ये 41 दिवसांच्या वाढीनंतर या किंमती आता स्थिर राहिल्या आहेत. दिल्लीत पेट्रोल किंमत 41.44 रुपये प्रति लिटरने वाढली तर डिझेलची किंमत 9.14 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत.

देशात एप्रिलमध्ये पेट्रोलमध्ये 16 आणि डिझेलमध्ये 14 पैसे प्रति लिटरने कमी आली आहे. दिल्लीत 12 जुलैला डिझेलच्या किंमतीमध्ये 16 पैसे प्रति लीटरने कमी आली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!