दलित साहित्याच्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर : लेखक अरूण खोरे
नवी दिल्ली प्रतिनिधी
6 ऑगस्ट
मराठी साहित्यातील दलित साहित्याच्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आल्याचे मत लेखक, संपादक अरुण खोरे यांनी व्याख्यानमालेत मांडले.
‘मराठी दलित साहित्याचे भारतीय साहित्याला योगदान’ या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत 50 वे पुष्प गुंफताना लेखक, संपादक अरूण खोरे बोलत होते.
श्री.खोरे पुढे म्हणाले, अमेरिकन विदूषी डॉ. एलेनोर जे़लियेट, प्राध्यापक गेल ओमवेट परदेशी अभ्यासकांनी दलित साहित्याचा अभ्यास केला आणि या साहित्यातील काही अंश इंग-जीत भाषातंरीत करून या साहित्याला आंतराराष्ट्रीय मंच उपलब्ध करून दिला. दलित लेखकांच्या आत्मकथनाचे कौतुक देशातंर्गत पेक्षा परदेशातील लेखकांनी अधिक केल्याचे श्री.खोरे यांनी यावेळी व्यक्त केले. अमेरीकेतील कॅलिर्फोर्निया येथील विद्यापीठात शिकविणारे मूळचे नांदेडचे असणारे प्रा. सुरज येंगडे हे येथील दलित साहित्याचे संदर्भ घेऊन तेथे चर्चा करीत असतात असेही श्री.खोरे यांनी सांगितले.
आपल्या देशातील असमानतेच्या पायर्?या मोडून काढण्यासाठी 19 व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी, तर 20 व्या शतकात नारायण मेघाजी लोखंडे, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेची विषवल्ली नष्ट करण्यासाठी आपले ज्ञान आणि आयुष्य पणाला लावले आणि यातूनच दलित साहित्याला खर्?या अर्थाने प्रेरणा मिळाली, असल्याचे श्री.खोरे म्हणाले.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठी साहित्याने आपली कुस बदलली आणि त्यानंतर दलित साहित्य आपल्या समोर आले. 1950-60 च्या दशकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कथा कांदबरीकार शंकरराव खरात, कवी कथाकार बाबुराव बागुल या सर्वांच्या लेखनामधून जगण्यातील जाणिवांच्या अनुभव येत गेले आणि हे लेखन समृद्ध होत गेले. दलित साहित्यातील लेखकांनी आपले प्रेरणा स्त्रोत डॉ.बाबासाहेब आंबेडकर असल्याचे वेळोवेळी उल्लेखले असल्याचे श्री.खोरे यांनी सांगितले.
1957 मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनामध्ये दलित साहित्याविषयी चर्चा मंथन करण्यात आले होते. या संमेलनानंतर मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याची चर्चा सुरू झाली असल्याचे श्री.खोरे यांनी आपल्या व्याख्यानात अधोरेखित केले. गंगाधर पानतावने यांच्या ‘अस्मिता दर्श’ या नियतकालिकाच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखक घडत गेले. यामध्ये सातत्याने लिहिणारे ज्येष्ठ लेखक प्रा. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे पहिले दलित आत्मकथन असल्याचे श्री.खोरे यांनी सांगितले. यानंतर या साहित्य प्रवाहाला वेग आला. यासोबतच कवितेच्या माध्यामातूनही कवी संवेदना लिहू लागल्या. यामध्ये प्रल्हाद चेंदवलकर, ज.वी. पवार, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ हे प्रमुख होते. हे सर्व लेखणीतून बंडखोरीचा उद्गार साहित्यातून मांडत होते. हे वेगळेच लिखाण होते. समीक्षकांना दलित साहित्याला आणि लेखकांना डावलता येणार नाही, हे सिद्ध झाले, असेही श्री खोरे म्हणाले.
दया पवार यांच्या ‘बलुत’ या स्वकथनाने दलित साहित्यातील लेखकांना वेगळी ओळख मिळाली. दलितांचे दैंनदिन जगणे लोकांपर्यंत पोहोचले. माधव कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे आत्मकथनही गाजले. यानंतरच्या काळात लक्ष्?मन माने यांचे ‘उपरा’, लक्ष्?मन गायकवाड यांची ‘उचल्या’ या आत्मकथनातून भटक्या विमुक्त लोकांचे जगणे जगासमोर आले. याच काळात उत्तम बंडु तुपे यांचे ‘काटयावरची पोटं’, रूस्तम अचलखांब यांचे ‘गावकी’ , शांताबाई कांबळे यांचे ‘माझ्या जीवनाची काहाणी’ कुमुद पावडे यांचे ‘अंत:स्फोट’ हे आत्मकथन आले. मंगला केवळे ‘जगायचंय प्रत्येक सेकंद’ मलिका अमरशेख यांचे ‘मला उद्धवस्त व्हायचे आहे’ या स्त्री लेखिकांमुळे दलित महिलांच्या दुखाच्या छटा, जगण समोर आले. या सर्व लिखाणांमुळे दलित साहित्याची चर्चा भारतीय साहित्यामध्ये होऊ लागली, असल्याचे निरीक्षण श्री खोरेंनी या वेळी मांडले.
गावाकुसरामध्ये असणार्?या लोकांचे विषम स्थान सोबतच गावकुसाबाहेर राहणार्या लोकांचे जगण साहित्यातून येत होते. याच्या पलिकडे ज्यांना या श्रेणीतही स्थान नव्हते अशा वर्गाच्या अनुभवाचे कथन श्रवणकुमार लिंबाळे यांनी त्यांच्या ‘अक्करमाशी’त केले. कोलाटी समाजातील दुखांची कथा सांगणारे किशोर शांताबाई काळे यांचे ‘कोल्हाटयाचे पोर’ हे एक वेगळया धाटणीच आत्मकथन होत, असेही श्री खोरे म्हणाले.
श्री.खोरे यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी जेव्हा लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड यांच्या मुलाखती घेतल्या त्यावेळी त्यांना जन्म कुठे झाला हे ही माहिती नसल्याचे कळत. बंडु तुपे यांच्याबाबतीतही हेच त्यामुळे जन्मापासून ज्यांची उपेक्षा झाली अशा सर्व उपेक्ष?त वर्गाचे दुख, दैन्य या आत्मकथनातून मराठीत मांडण्यात आले. त्यामुळे खर्या अर्थाने मराठी साहित्याला बळ मिळाले, असल्याचे ते म्हणाले.
दलित साहित्याने मराठी साहित्याला वळण दिल्याचे सांगुन श्री खोरे म्हणाले, दलित लेखकांनी तरूण वयातच आत्मचरित्रे लिहिली. पूर्वी असा प्रघात होता की, ज्येष्ठ नागरीक झाल्यावरच चरित्र लेखन होत असे मात्र हा पायंडा दलित लेखकांनी मोडला. दलित सनदी अधिकार्?यांनीही त्यांच्या वाटेला आलेले दु:ख, वेदना आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेत. रत्नाजी आगवने यांनी ‘माझी वाकर’ हे आत्मकथन लिहिले. ते खूप गाजलेही, असे श्री.खोरे यांनी व्याख्यानात सांगितले. पुढे गुजराती, हिंदी, तेलगू, तमीळ, मल्ल्याळी भाषेतूनही दलित लेखन साहित्य पुढे आले.
दलित साहित्य मोठ्या प्रमाणात बोली भाषेतच ?लिहिल्यामुळे लेखनामधील भाषा ही सामान्यांना समजण्यासाठी थोडी अवघड जात होती. अशा वेळी वाचकांकडूनच काही शब्दांबद्दल शेवटच्या परिशिष्ठांमध्ये स्पष्टीकरण असावे, अशी मागणी येत असे. पुढे भीमराव जाधव गुरूजींनी ‘कुंपणा पलीकडची कथा’ या आत्मकथनामध्ये सेटलमेंट कॉलनीमधल्या जगण्यावर आधारित लेखनात अगदी सोप्या सरळ भाषेत समाजाच्या वेदना मांडल्या असल्याचे श्री खोरे यांनी सांगितले.
आत्मकथने लिहिण्याची प्रेरणा दलित लेखकांना मुख्यत: बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचून मिळाली असल्याचेही श्री खोरे यांनी नमूद केले. त्यामुळेच बाबासाहेबांच्या नंतरच्या पिढीनेही खडतर परिस्थितीतही शिक्षण घेतले आणि आपले अनुभव लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केले. या लिखाणामुळे अनुसूचित जातीचे, भटक्यांचे, विमुक्त जातीतील लोकांचे जगणे समाजाला कळले. यासोबतच या आत्मकथनामुळे समाजातील संवेदनशीलता वाढली. आणि एक चांगले माणूस म्हणून जगण्याची नव्याने सुरूवात झाली. याचा चांगला परिणाम मराठी साहित्यावर झाला आणि तेच बळ भारतीय साहित्यालाही मिळाले असल्याचे श्री खोरे म्हणाले.
यशवंतराव चव्हाण हे दलित साहित्याचे जाणकार
यशवंतराव चव्हाण हे दलित साहित्याचे चांगले जाणकार होते. चांगले समीक्षण आणि सुजाण संवेदनशिल वाचक होते. त्यामुळे नामदेव ढसाळ, दया पवार, लक्ष्मण माने, ना.धो. महानोर हे त्यांचे आवडते लेखक कवी होते. या सर्व लेखकांना एकत्रित करून श्री.चव्हाण यांनी त्यांच्या सोबत गप्पा मारलेल्या आहेत. या साहित्यिकांच्या रचना त्यांनी ऐकलेल्या आहेत. लक्ष्मण माने यांच्या बंद दार या पुस्तकांच्या प्रकाशनाला यशवंतराव चव्हाण आलेले होते. तेव्हा त्यांना विमान प्रवासातील प्रसंग बोलून दाखविला असल्याचे श्री खोरे यांनी यावेळी उल्लेख केला.