आंगणवाडी सेविकांसाठी मेक इन इंडिया स्मार्ट फोन
नवी दिल्ली प्रतिनिधी
6 ऑगस्ट
आंगणवाडी सेविकांना प्रभावी सेवा देता यावी यासाठी, सरकारी ई-मार्केट द्वारा खरेदी केलेल्या स्मार्ट फोन द्वारे त्यांच्या सबलीकरणाची तरतूद आहे. आंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रालय राज्यांकडे पाठपुरावा करत असून नुकत्याच झालेल्या राज्यांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 32 राज्ये केंद्र शासित प्रदेशांनी एकूण 8.66 लाख स्मार्ट फोन खरेदी केले आहेत. याशिवाय जी एफ आर आणि दक्षता विषयक मार्गदर्शक तत्वांना अनुसरत राज्ये केंद्र शासित प्रदेशांनी पारदर्शी प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पोषण अभियानचे मोबाईल एप्लिकेशन, अंगणवाडी सेविकांकडून उपयोगात आणल्या जाणार्या रजिस्टरचे डीजीटायझेशन आणि स्वयंचलन करते. यामुळे या सेविकांच्या वेळेची बचत होऊन कामाचा दर्जाही उंचावतो. त्याच बरोबर त्यांना देखरेखीची सुविधाही देतो. बिहारसह राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी पोषण अभियाना अंतर्गत खरेदी केलेल्या स्मार्ट फोनचे तपशील परिशिष्ट घ् मध्ये देण्यात आले आहेत-
पोषण अभियाना अंतर्गत, 2019-20 आणि 2020-21 या वित्तीय वर्षाकरिता, स्मार्ट फोन खरेदीसह कार्यक्रम अंमलबजावणीसाठी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना जारी करण्यात आलेला निधी आणि 31 मार्च 2021 पयर्ंत एकूण केंद्रीय निधीचा वापर परिशिष्ट घ्घ् मध्ये देण्यात आला आहे.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.