टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय मुलींची छाप, 6 खेळाडूंनी डागले 12 गोल

टोकियो

6 ऑगस्ट

भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकता आलं नाही. तरीदेखील त्यांनी टोकियो इतिहास रचला. भारतीय महिला हॉकी संघ प्रथमच ऑलिम्पिक इतिहासात उपांत्य फेरीत पोहोचला होता. ते पहिल्या चारमध्ये राहिले. हे सर्व शक्य झालं भारताच्या 6 महिला खेळाडूंमुळं. तर तर सर्व खेळाडूंचं संघाच्या विजयात योगदान राहिलं. पण त्या सहा महिला खेळाडूंनी दणादण गोल डागत आपली छाप संपूर्ण जगात सोडली.

भारताच्या 6 महिला खेळाडूंनी एकूण 12 गोल केले. यात सर्वाधिक 4 गोल हे भारताची अनुभवी स्टार फॉरवर्ड खेळाडू वंदना कटारिया हिने केले. तिने स्टेज ग-ुपमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामना हॅट्टि्र्क गोल केला. ती ऑलिम्पिक इतिहासात हॅट्टि्र्क गोल करणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. यानंतर तिनं बि-टनविरुद्धच्या कास्य पदकासाठीच्या सामन्यात एक गोल केला. नॉकआउट स्टेजमध्ये वंदनाने केलेला हा भारतीय महिला संघाचा पहिला गोल ठरला.

वंदना कटारिया हिच्यानंतर गुरजीत कौर हिने महत्वाच्या सामन्यात आपली प्रतिभा दाखवत गोल केले. ती भारताची स्टार डिफेंडर आणि ड्रॅक फ्लिक स्पेशालिस्ट आहे. तिने या स्पर्धेत 4 गोल केले. तिनं उपांत्यपूर्व, उपांत्य आणि कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात हे गोल केलं.

वंदना कटारिया आणि गुरजीत कौर यांच्या व्यतिरिक्त कर्णधार राणी रामपाल, शर्मिला देवी, नवनीत कौर आणि नेहा यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला. या सर्व धाडक खेळाडूंच्या गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला.

भारतीय महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिकमधील कास्य पदकाचे स्वप्न भंगले आहे. बि-टनने कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताचा 4-3 ने पराभव केला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने दर्जेदार खेळ केला. पण गत सुवर्ण पदक विजेत्या संघाला ते पराभूत करू शकले नाहीत. या सामन्यात गुरजीतने दोन तर वंदना कटारिया हिने एक गोल केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!