ना बेझोस ना इलॉन मस्क, आता बर्नार्ड अॅरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
नवी दिल्ली प्रतिनिधी
6 ऑगस्ट
लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रँड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली असून त्यामध्ये बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत हे स्थान पटकावलं आहे.
फ्रान्सच्या थ्%श्प् या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती आता 198.9 अब्ज डॉलर्स इतकी असून जेफ बेझोस या यादीत 194.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसर्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इलॉन मस्कचा नंबर लागत असून त्याची संपत्ती ही 185.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्या आठवड्यात अमेझॉनच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घट झाली. जेफ बेझोस याने एकाच दिवसात जवळपास 14 अब्ज डॉलरची संपत्ती गमावली होती. त्याचा फायदा बर्नार्ड अॅरनॉल्टला झाला असून तो थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
बर्नार्ड अॅरनॉल्ट यांनी 1984 साली लग्जरी गुड मार्केटमध्ये पाऊल टाकलं होतं. कोरोनाच्या काळात बर्नार्ड अॅरनॉल्टच्या लुईस विटन या लग्जरी ब-ॅन्डचा खप मोठ्या प्रमाणात झाला आहे. या काळात बर्नार्ड अॅरनॉल्टच्या कंपनीचा महसूल हा 17.4 अब्ज डॉलर्सनी वाढला. कोरोनाच्या पूर्व काळाशी तुलना करता ही वाढ 14 टक्क्याहून अधिक आहे.