हनी सिंगला कोर्टाकडून नोटीस : अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा पत्नीचा आरोप
मुंबई प्रतिनिधी
5 ऑगस्ट
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील स्टार्स त्यांच्यासोबत घडणार्या चुकीच्या गोष्टींवर पुढे येऊन बोलताना दिसत आहेत. त्यात सध्या बॉलिवूडचा रॅपर, गायक आणि अभिनेता यो यो हनी सिंग वादाच्या भोवर्यात सापडला आहे. आणि तो त्याच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
गायक यो यो हनी सिंगवरवर पत्नी शालिनी तलवारने अनेक गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळ, लैंगिक त्रास यासह अनेक मोठे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनंतर घरगुती हिंसाचार कायद्यातंर्गत हनी सिंगच्या पत्नीने दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका 3 ऑॅगस्टला दाखल केली आहे.कोर्टाने हनी सिंगला नोटीस पाठवून 28 ऑॅगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
हनी सिंगवर पत्नीचे गंभीर आरोप
नवरा हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबियांनी अनेकदा माझा शारीरिक, शाब्दिक, मानसिक आणि भावनिक छळ केला असा आरोप शालिनीने केला आहे. नवर्याने आपल्याला अनेकदा मारहाण केली, असा दावा शालिनीने केला आहे.
या प्रकरणात आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. हनी सिंगच्या पत्नीने त्याच्याकडे नुकसान भरपाईपोटी 10 कोटी रुपयाची मागणी केली आहे. जनावराप्रमाणे आपल्याला वागवण्यात आलं’ असं तिने म्हटलं आहे. सोबतच नवर्याचे अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचाही तिने आरोप केलाय. दिल्लीत घरभाड्यापोटी हनी सिंगला दर महिन्याला 5 लाख रुपये देण्याचेही आदेश द्यावेत, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.
मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी तानिया सिंग यांनी हनी सिंगला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये नोएडामध्ये दोघांच्या मालकीच्या संयुक्त संपत्तीमध्ये तिसर्या पक्षकाराला अधिकार देऊ नका तसेच पत्नीचे दागिने आणि अन्य वस्तु विकू नका असे निर्देश दिले आहेत. शालिनी तलवारच्या वकीलाने ही माहिती दिली आहे.
हनी सिंग आणि त्याचे कुटुंबिय मला शारीरिक इजा पोहोचवतील या भितीमुळे मी याआधी उघडपणे बोलू शकले नाही, असे शालिनीने सांगितले.नवर्याकडून होणार्या या छळामुळे आपण नैराश्यात गेलो तसेच आपल्याला वैद्यकीय मदतीची गरज लागली, असे शालिनी तलवारने म्हटले आहे. तिने नवर्यावर फसवणुकीचाही आरोप केला.