प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम डिसेंबर पासून, खेळाडूंचा लिलाव 29 ते 31 ऑगस्ट पर्यंत
मुंबई प्रतिनिधी
5ऑगस्ट
व्हीव्हो प्रो कबड्डी लीग (पीकेएल) वापसाची तयारी करत असून आठव्या हंगामाची सुरुवात या वर्षाच्या डिसेंबर पासून होईल तर यासाठी खेळाडूंचा लिलाव 29 ते 31 ऑगस्ट पर्यंत निर्धारित करण्यात आला आहे.
लीगचा आयोजक मशाल स्पोर्टस हे 12 फ्रेंचाइजीसह मुंबईमध्ये आठव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव करेल. पीकेएलच्या 8 व्या हंगामासाठी प्लेयर पूलसाठी 500 पेक्षा अधिक खेळाडू सामिल आहेत. आयोजकांनुसार प्रत्येक फ्रेंचाइजीसाठी वेतन पर्स 4.4 कोटी रुपये आहे.
आठव्या हंगामात प्लेयर ऑक्शनमध्ये घरगुती, विदेशी आणि नवीन युवा खेळाडू (एनवायपी) चार श्रेणीमध्ये विभाजीत होतील. यात ए,बी,सी आणि डी श्रेणी असून प्रत्येक श्रेणीमध्ये खेळाडूना अष्टपैलू, संरक्षक आणि रेडर्सच्या रुपांमध्ये उपविभाजीत केले जाईल.
प्रत्येक श्रेणीसाठी आधार मूल्य श्रेणी तीस लाख रुपये ते 60 लाख रुपये आहे. आठव्या हंगामासाठी आपल्या दस्त्यासाठी प्रत्येक फ्रेंचाईजी 4.4 कोटी रुपये खर्च करु शकते आहे.
आयोजकांनी सांगितले की या हंगामाला कोरोना प्रोटोकॉलला पाहता आणि सुरक्षीत पध्दतीने डिसेंबर पासून सुरु केले जाईल. पीकेएल हंगाम -7 चे आयोजन 2019 मध्ये करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या कारणामुळे लीगचे आयोजन 2020 मध्ये करण्यात आले नव्हते.