ऑॅलिम्पिक हॉकीत यंदाचं भारताचं बारावं पदक, यापूर्वी कधी अन् कुठल्या ऑॅलिम्पिकमध्ये जिंकली पदकं?

नवी दिल्ली प्रतिनिधी

5 ऑॅगस्ट

भारतीय पुरुष हॉकी संघानं जर्मनीवर 5-4 अशी मात करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. तब्बल 41 वर्षांनी भारताना धडाकेबाज खेळी करत ऑॅलिम्पिक पदक जिंकलं आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. दरम्यान, आजच्या विजयासह हॉकीत भारतानं आतापर्यंत 12 ऑॅलिम्पिक पदकांवर नावं कोरली आहेत.

यापूर्वी भारताच्या वासुदेवन भास्करनच्या नेतृत्त्वात 1980 मध्ये मॉक्सो ऑॅलिम्पिकमध्ये भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आजच्या पदाकासोबतच ऑॅलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या 12 झाली आहे. यापैकी 8 सुवर्णपदकं, एक रौप्यपदक आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे.

हॉकीमध्ये भारताना आपलं शेवटचं पदक 1980 मध्ये मॉक्सो ऑॅलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. त्यावेळी वासुदेवन भास्करन कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्त्वात भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत भारताचं सर्वात चांगलं प्रदर्शन 1984 च्या लॉस अ‍ॅजलोसमध्ये होतं. या ऑॅलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पाचव्या स्थानावर होता. आजच्या विजयानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑॅलिम्पिक हॉकीमधील पदकांचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

भारतीय हॉकी संघानं केव्हा अन् कधी जिंकली ऑॅलिम्पिक पदकं?

भारतीय हॉकीत एक काळ असाही होता, जेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष भारतीय हॉकी संघावर असायचं. या काळात हॉकीचे जादूगार महान ध्यान चंद एकटेच विरोधी संघाच्या 11 खेळाडूंवर भारी पडत असत. भारताना 1928-1956 मध्ये सलग सहा वेळा ऑॅलिम्पिक हॉकीचं गोल्ड मेडल आपल्या नावे केलं होतं. या काळाला भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जातं.

भारतीय हॉकी संघानं ऑॅलिम्पिकच्या हॉकी इव्हेंटमध्ये आपलं पहिलं सुवर्णपदक 1928 मध्ये एम्सटर्डम ऑॅलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. मेजर ध्यानचंद यांनी या संपूर्ण ऑॅलिम्पिकमध्ये एकट्यानं सर्वाधिक 14 गोल डागले होते. तर भारतीय संघानं 5 सामन्यात एकूण 29 गोल डागले होते. या ऑॅलिम्पिकमध्ये अंतिम लढ भारत आणि नेदरलँडमध्ये रंगली होती. मेजर ध्यानचंद यांच्या शानदार हॅक्ट्रिकच्या जोरावर टीम इंडियानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिकलं होतं. खास गोष्ट म्हणजे, भारताविरोधात संपूर्ण ऑॅलिम्पिकमध्ये कोणताही संघ एकही गोल डागू शकला नव्हता.

त्यानंतर भारतानं 1932 च्या लॉस एंजोलोस ऑॅलिम्पिक, 1936 ची बर्लिन ऑॅलिम्पिक, 1948 मध्ये झालेली लंडन ऑॅलिम्पिक, 1952 ची हेलसिंकी ऑॅलिम्पिक आणि 1956 ची मेलबर्न ऑॅलिम्पिक अशा सलग सहा ऑॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती.

भारताची पदकं :

सुवर्ण पदकं : 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964, 1980

रौप्य पदकं : 1960

कांस्य पदकं : 1968, 1972, 2020

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!