वेब मीडिया असोसिएशनच्या रावेर तालुका सचिव पदी इकबाल पिंजारी ऐनपुरकर यांची निवड

ऐनपुर प्रतिनिधी:-

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशन रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची रावेर तालुका कार्यकारिणी झाली जाहीर असून रावेर तालुका अध्यक्ष भीमराव कोचुरे तर सचिव पदी इकबाल पिंजारी ऐनपुरकर यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की वेब मिडिया संस्थापक अध्यक्ष श्री अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने विभागीय अध्यक्ष श्री अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री ईश्वरभाऊ चोरडिया यांनी श्री.भानुदास भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष श्री.मयुर मेधे , जिल्हा सचिव श्री.दिनेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस श्री.अमोल व्यहारे, जिल्हा खजिनदार श्री दिपक पवार यांच्या उपस्थितीत रावेर तालुक्यातील वेब मिडिया असोसिएशन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली
पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे.
रावेर येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते रावेर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष श्री.भिमराव कोचुरे,तालुका सचिव श्री.इकबाल पिंजारी,तालुका उपाध्यक्ष श्री.युसुफ शहा आणि श्री.सुनिल चौधरी
सरचिटणीस सौ.कविताताई सचिन सकळकळे तर तालुका समन्वयकश्री.मुबारक तडवी यांची निवड करण्यात आली आहे तर रावेर तालुका कार्यकारिणी वर अनेक सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!