बॉक्सर लवलीनाला आसाम सरकारचं अनोखं गिफ्ट, घरापर्यंत बनवला पक्का रस्ता

गुवाहाटी

4 ऑॅगस्ट

महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तिच्या या कामगिरीनंतर आसाम सरकारनं तिला एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. तिच्या घरापर्यंत जाणारा पक्का रस्ता सरकारकडून तयार करण्यात आला आहे. स्थानिक आमदार बिस्वजीत फूकन यांनी लवलीनाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता बनवून घेतला आहे.

लवलीनाचे वडील टिकेन यांनी सांगितलं की, आता तिनं पदक जिंकलं आहे. तर सरकारनं रस्ता बनवला आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, कारण हा रस्ता म्हणजे लवलीना आणि आमच्या गावासाठी एक पुरस्कारच आहे.

माजी विश्वचॅम्पियनला नमवत पदकावर शिक्कामोर्तब

क्वार्टर फायनल सामन्यात भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेन ला 4-1 अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं. याआधी लवलीनानं जर्मनीच्या अनुभवी र्‍र्ग्हा अर्जूै ला पराभूत केलं होतं. आता लवलीनानं आपलं पदक निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे. 69 किलोग-ाम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

आसामच्या छोट्या खेड्यातून सुरु झाला प्रवास

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणार्‍या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑॅलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

माईक टायसन, मोहम्मद अली आवडते

लवलीनाला माइक टायसनची स्टाईल आवडते तर मोहम्मद अली देखील तेवढेच आवडतात. मात्र आता तिनं या दोघांप्रमाणेच आपली वेगळी ओळख बनवली आहे. 2018 मध्ये लवलीनानं दिल्लीत आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर रशियात आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये लवलीनानं पुन्हा कांस्यपदक जिंकलं होतं.

लवलीनाच्या दोन बहिणीही बॉक्सिंगमध्ये

लवलीना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑॅक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किकबॉक्सिंगमध्ये आली.

ऑॅलिम्पिकच्या आधीच आईची झाली सर्जरी

ऑॅलिम्पिकच्या आधीचे काही दिवस लवलीनासाठी खूप कठिण होते. ऑॅलिम्पिकआधी सर्व खेळाडू ट्रेनिंगमध्ये असताना लवनीना मात्र बॉक्सिंगपासून दूर होती. लवलीनाच्या आईची कीडनी ट्रान्सप्लांट सर्जरी या काळात झाली. ही सर्जरी झाल्यानंतर लवलीना ट्रेनिंगसाठी परतली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!