लवलिनाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र देशासाठी कांस्यपदक जिंकलं

टोक्यो

4 ऑॅगस्ट

महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं. आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळालं नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

क्वार्टर फायनल सामन्यात भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेन ला 4-1 अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं. याआधी लवलीनानं जर्मनीच्या अनुभवी र्‍र्ग्हा अर्जूै ला पराभूत केलं होतं. आता लवलीनानं आपलं पदक निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे. 69 किलोग-ाम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

आसामच्या छोट्या खेड्यातून सुरु झाला प्रवास

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणार्‍या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑॅलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

लवलीनाला माइक टायसनची स्टाईल आवडते तर मोहम्मद अली देखील तेवढेच आवडतात. मात्र आता तिनं या दोघांप्रमाणेच आपली वेगळी ओळख बनवली आहे. 2018 मध्ये लवलीनानं दिल्लीत आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर रशियात आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये लवलीनानं पुन्हा कांस्यपदक जिंकलं होतं.

लवलीना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑॅक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किकबॉक्सिंगमध्ये आली.

ऑॅलिम्पिकच्या आधीचे काही दिवस लवलीनासाठी खूप कठिण होते. ऑॅलिम्पिकआधी सर्व खेळाडू ट्रेनिंगमध्ये असताना लवनीना मात्र बॉक्सिंगपासून दूर होती. लवलीनाच्या आईची कीडनी ट्रान्सप्लांट सर्जरी या काळात झाली. ही सर्जरी झाल्यानंतर लवलीना ट्रेनिंगसाठी परतली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!