जाणून घ्या किती टक्के विद्यार्थी काठावर पास, तर कितींना 100 टक्के गुण

मुंबई प्रतिनिधी

3 ऑगस्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज (मंगळवारी) दुपारी इयत्ता बारावीचा निकाल जाहील करण्यात आला. कोरोना संकटामुळं प्रभावत झालेली निकालाची ही आकडेवारी काही अंशी वाढल्याचं दिसून आलं. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल यंदा जाहीर करण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल जाहीर होण्यास काहीसा विलंबही झाला. इयत्ता बारावीमध्ये यंदाच्या वर्षी तब्बल 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 12 विद्यार्थी हे काठावर पास झाले.

काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले. तर, यंदा तब्बलल 46 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. यंदाच्या वर्षी सर्वाधिक निकाल हा वाणिज्य शाखेचा लागला. ज्यामध्ये 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, त्यामागोमाग कला शाखेला निकाल, 99.83 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल यामध्ये 99.45 टक्के इतका लागला.

बारावीच्या यंदाच्या वर्षीच्या निकालांमध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून, या भागात 99.81 टक्के इतका निकाल लागला. तर, त्यामागोमाग मुंबई विभागात 99.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर या भागांचा निकाल अनुक्रमे 99.75, 99.67, 99.65 आणि 99.62 टक्के इतका लागला. यंदाच्या वर्षी निकालाची एकंदर आकडेवारी पाहता पुन्हा एकदा मुलींनीच बाजीर मारली असून, 99.73 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या, तर 99.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!