स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी संपूर्ण भारतीय ऑॅलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी आमंत्रित करणार

नवी दिल्ली प्रतिनिधी

3 ऑगस्ट

येत्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतीय ऑॅलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या सर्वांना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये 120 पेक्षा जास्त खेळाडूंसह 228 लोकांची तुकडी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. पंतप्रधान मोदी नियमितपणे संघाला प्रोत्साहन देतात आणि अनेक खेळाडूंशी संवाद साधतात.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!