उत्पादन व पुरवठयासाठी बोईंगचा रघु वामसी बरोबर करार, हैद्राबादमध्ये 15 दशलक्ष डॉलरची सुविधा स्थापित होणार

हैद्राबाद प्रतिनिधी

2ऑगस्ट

हैद्राबादमधील एयरोस्पेस फर्म रघु वामसीने सोमवारी घोषणा केली की योग्य घटकांचे उत्पादने आणि पुरवठयासाठी बोइंगने त्यांच्या बरोबर एक करार केला आहे. कंपनी 15 दशलक्ष डॉलरच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह हैद्राबादमधील आदिबल्लामध्ये बोईंगच्या आवश्यकतांसाठी समर्पित एक सुविधा स्थापित करेल. तसेच ही कंपनी पुढील तीन वर्षात 300 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देईल.

रघु वामसींच्या बोईंग बरोबरील या करारामुळे तेलंगानामध्ये वाढत्या एयरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांच्या समर्थनामध्ये कुशल कार्यबलाचा एक पूल उपलब्ध होईल.

रघु वामसीचे व्यवस्थापकीय निदेशक वामसी विकास गुणसुल्लानी म्हटले की हे फक्त रघु वामसीसाठीच नाही तर तेलंगाना राज्यासाठी एक महत्वपूर्ण मैलाचा दगड आहे. करार हा आमच्या योग्य निर्माण, सततचा पुरवठा आणि पहिल्यांदाच गुणवत्तेचे प्रमाण आहे.

पुरवठा साखळी व्यवस्थापक, बोईंग इंडियाचे निदेशक अश्विनी भार्गवनी म्हटले की हे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोणाच्या प्रति आमच्या कटिबध्दतातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे. भारतामध्ये सात दशकांपेक्षा अधिकची उपस्थिती असलेल्या कंपनीच्या रुपात बोईंग भारतामध्ये एयरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांच्या विकासाचे समर्थन करण्यावर केंद्रित आहे.

एका दशकापेक्षा अधिक काळापासून रघु वामसी भारत व विदेशांमध्ये ए अँड डी उद्योगासाठी उच्च गुणवत्ता असलेल्या योग्य भागांचे निर्माण आणि पुरवठयासाठी समर्पित आहे. कंपनीने आपले तंत्रज्ञान विकास आणि व्यवसायाच्या विकासासाठी जागतीकस्तरीय कंपनीं बरोबर अनेक रणनीतीक भागेदारी केली आहे.

हैद्राबादमधील रघु वामसी कंपनीचे तेलंगानातील विकासशील ए अँड डी पारिस्थितीकी तंत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान राहिले आहे आणि भारतामधील एक प्रमुख जागतीक एयरोस्पेस बाजार बनण्या बरोबरच ही वाढण्यासाठी अग-ेसर आहे.

रघु वामसी आंतरराष्ट्रीय आणि घरगुती ओईएमसाठी वाणिज्यीक विमाने, संरक्षण आणि अंतरीक्ष प्रणालीसाठी अत्याधिक महत्वपूर्ण भाग आणि उप संयोजनांचे निर्माण करते आहे.

एयरोस्पेस अँड डिफेंस (ए अँड डी) मध्ये शीर्ष भारतीय निर्यातकांपैकी एकच्या रुपात कंपनीच्या हैद्रबादमध्ये चार विनिर्माण शाखा आहेत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यां बरोबर संयुक्त उद्यम आहेत जे सीएनसी विनिर्माण, शीट मेटल फॅबि-केशन, कंपोजिटस, फास्टनरो, गियर्स आणि इंजीनियरिंग सेवांच्या अनेक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. हे मागील 15 वर्षा पासून जीई एव्हिएशन, हनीवेल, रोल्स रॉयस, कोलिन्स एयरोस्पेस, ईटन हॉलिबर्टन, डीआरडीओ, बीडीएल, एचएएल आणि इस्त्रो सारख्या आंतरराष्ट्रीय आणि घरगुती संस्थाना पुरवठा करत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!