केरळ व्यापार्यांचा तुटतोय संयम; निर्बंध असतानाही 9 ऑॅगस्टला उघडणार दुकाने
तिरुवनंतपुरम
2 ऑगस्ट
कोरोनाच्या दुसर्या लाटेतही व्यवसायावर निर्बंध राहिल्याने केरळमधील व्यापार्यांचा संयम तुटत आहे. व्यवसायी एकोपना समिती या केरळमधील व्यापार्यांच्या संघटनेने 9 ऑॅगस्टला दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले आहे.
व्यवसायी एकोपना समितीतचे अध्यक्ष टी. नसरुद्दीन म्हणाले, की राज्य सरकारला सर्व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी भरपूर वेळ दिला आहे. तरीही काहीही बदल झाला नाही. केरळ सरकारने जाहीर केलेल्या कोव्हिड पॅकेज म्हणजे काहीच नाही. आम्ही 9 ऑॅगस्टला दुकाने उघडणार आहोत.
जुलै महिन्यात कोझीकोडे येथे विविध व्यापार्यांनी आंदोलने केली आहेत. आम्हालाही जगायचे आहे, अशा त्यांनी घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पोलिसाबरोबर वाद झाला होता. आमचे कोण कर्ज कोण फेडणार आहे. (लॉकडाऊन) अनिश्चितकाळासाठी असू शकत नाही. केरळमधील व्यापारी संघटनेनेही व्यापार्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शविला आहे.
कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी व्यापार्यांच्या निर्णयानंतर कोविडच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळातील कठोर नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी केरळच्या व्यापार्यांना कारवाईचा इशाराही दिला आहे. व्यापार्यांची राज्यस्तरीय समितीची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करून काय रणनीती आखायची आहे, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.