कोरोनाची तिसरी लाट ऑॅगस्ट महिन्यातच; तर ऑॅक्टोबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांक गाठणार
नवी दिल्ली प्रतिनिधी
2 ऑॅगस्ट
देशात कोरोनाचा कहर असून दुसर्या लाटेमुळे देशात भंयकर परिस्थिती निर्माण झाली होती. स्मशानभूमीत विदारक असे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना यातच तिसर्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशात शिथिल करण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची तिसरी लाट ऑॅगस्ट अखेरपर्यंत येईल आणि ऑॅक्टोंबर महिन्यात लाट शिखरावर असेल, असे एका अहवालात म्हटलं आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेत दरदिवशी लाखाने रुग्णांची नोंद होऊ शकते, असे तज्ञांनी सांगितले. कोरोनाच्या दुसरया लाटेत परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. जर तिसरी लाटही अशीच भंयकर असली, तर देशासमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तिसर्या लाटेमध्ये परिस्थिती चिंताजनक झाल्यास दिवसाला रुग्णसंख्येचा आकडा दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हैदराबाद आणि कानपूरच्या आयआयटीतील मथुकुममल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग-वाल यांच्या नेतृत्वामधील संशोधनाचा हवाला देत, ब्लूमबर्गने सांगितले, की सध्याची वाढती कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाच्या तिसर्या लाटेला पुढे नेईल. तर ऑॅक्टोंबरमध्ये लाट शिखरावर असेल. केरळ आणि महाराष्ट्रात ज्याप्रकारे कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यावरून लक्षात येते, की परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. तिसर्या लाटेचा या दोन राज्यांना सर्वांत जास्त धोका आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, करोनाची तिसरी लाट ही दुसर्या लाटेइतकी घातक नसेल, असंही सांगितलं जात आहे. यापूर्वी विद्यासागर यांनी भारतामधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मॅथमॅटिकल मॉडलच्या आधारावर मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक पहायला मिळेल असं म्हटलं होतं. मात्र, विद्यासागर यांचा अंदाज चुकला होता. तसेच कोरोना विषाणूचा डेल्टा वेरिएंट चिकनपॉक्सप्रमाणे (कांजण्या) पसरू शकतो. तसेच हा कोरोना लस घेतलेल्यांनाही होऊ शकतो.
भारतात गेल्या 24 तासांत 40,134 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 422 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 36,946 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती
एकूण रुग्ण : 3,16,95,958
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 3,08,57,467
एकूण मृत्यू : 4,24,773
सक्रिय रुग्ण संख्या : 4,13,718
एकूण लसीकरण: 47,22,23,639 (17,06,598 गेल्या 24 तासांत )