संजय राऊतांवर निलेश राणेंचा एकेरी भाषेत हल्लाबोल, म्हणाले, राऊतांना सेनाभवनात फटके टाकणार!

मुंबई प्रतिनिधी

2 ऑगस्ट

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणार्‍या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग-लेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेशी पंगा घेणारा जन्माला यायचाय, असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांना अग-लेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल केला आहे.

शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाचष्ठ असा माणूस अद्याप जन्माला यायचाय; शिवसेनेचं टीकास्त्र

निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, हे काय ऐकतोय मी की संजय राऊत धमकी द्यायला लागले, संजय राऊत तू फटके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग-ेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत, अशा शब्दात निलेश राणे यांनी एकेरी भाषेत टीका केली आहे.

निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संजय राऊत मोजून बघ. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतो, असं राणेंनी म्हटलं आहे.

निलेश राणे यांनी टवीटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात या कुठल्या औलादी जन्माला आलेत ज्याना वाटतं ही अशी फडतूस नावं ठेवून आम्हाला घाबरू शकतात? मला फरक पडत नाही. पोलीस डिपार्टमेंटने हे गंभीरतेने घ्यावं कारण जो माणूस वॉन्टेड दहशतवादी आहे त्याला जर महाराष्ट्रात काही जण देव समजत असतील तर त्यांना आत्ताच ठेचून काढा, असंही राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणार्‍या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग-लेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेशी पंगा घेणारा जन्माला यायचाय, असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांना अग-लेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत, ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही, असं म्हणत अग-लेखातून भाजपवर तोफ डागली आहे. तसेच शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाचष्ठ असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे, असंही अग-लेखात नमूद करण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!