16 कोटींचं इंजेक्शन देऊनही वेदिकाचा मृत्यू; दुर्मिळ आजाराने होती ग्रस्त

पिंपरी-चिंचवड

2 ऑॅगस्ट

दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अकरा महिन्याच्या वेदिकाने रविवारी जगाचा निरोप घेतला. तिला जून महिन्यात 16 कोटींचे इंजेक्शन देण्यात आले होते. ही सर्व रक्कम क्राऊड फंडिंगद्वारे जमा करण्यात आली होती. वेदिकाच्या आई वडिलांनी मोठे कष्ट घेतले होते. मात्र, तिचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.

लोकनिधी व सीएसआरमार्फत पैसे जमवले –

वेदिका सौरभ शिंदे ही डचअ ढधझए 1 या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. तिला ही लस अमेरिकेतून आयात करून जून महिन्यात देण्यात आली होती. वेदिका अवघ्या 8 महिन्यांची असताना तिला डचअ ढधझए 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर ही लस देणे गरजेचे होती. त्याप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून तब्बल 16 कोटी रुपये लोकनिधी व सीएसआर मार्फत जमा केले. ज्या दात्यांनी आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली होती. मात्र, अखेर वेदिकला मृत्यूने गाठले आणि रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

देश-विदेशातून वेदिकासाठी मदतीचा हात

मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, अनेक राजकीय मंडळी, पत्रकार तसेच देशातील जनतेबरोबर विदेशातून देखील वेदिकासाठी मदतीचा ओघ सुरू होता.

’आमदार, खासदारांनी केली मदत’

’खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली. संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणीदेखील केली होती. भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी सुरुवातीपासून लस मिळेपर्यंत शिंदे कुटुंबासोबत उभे राहून लागेल ती मदत केली’, अशी माहिती वेदिकाच्या कुटुंबीयांनी दिली होती.

लसीवरील आयातशुल्क व कर माफ

लसीवरील आयात शुल्क माफ करण्याकरिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालयाबरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केला आहे. यासाठी सिने-अभिनेते निलेश दिवेकर अणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते, अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली होती. मात्र, दुर्मिळ आजाराने ग-स्त असलेल्या अकरा महिन्याच्या वेदीकाने रविवारी जगाचा निरोप घेतला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!